नवी दिल्ली (वृत्तसंस्था) आसाम आणि मिझोराम या दोन राज्यात सीमावादावरुन सध्या धुमश्चक्री सुरु आहे. मिझोराम पोलिसांनी केलेल्या गोळीबारात आसामचे ६ पोलिसांचा मृत्यू झाला आहे. तर आसाममध्ये कार्यरत असलेले मराठमोळे IPS वैभव निंबाळकर यांच्या पायाला गोळी लागून ते जखमी आहेत. या सर्व हिंसाचारानंतर आता मिझोरामने थेट आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्व सर्मा यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
आसाम आणि मिझोरामच्या सीमारेषा लागून असलेल्या कचर भागामध्ये काही दिवसांपूर्वी गोळीबार झाला. यामध्ये ६ मिझोराम पोलिसांचा मृत्यू झाला असून पोलीस अधिकारी वैभव निंबाळकर हे जखमी झाले आहेत. या पार्श्वभूमीवर सुरू झालेला वाद अजूनही शमण्याचं नाव घेत नाहीये. या प्रकरणात शुक्रवारी आसाम प्रशासनाने मिझोरामच्या संबंधित कोलासिब जिल्हा प्रशासनातील ६ अधिकाऱ्यांना चौकशीसाठी नोटीस पाठवली. त्याशिवाय, मिझोरामचे राज्यसभेतील एकमेव खासदार के. वनलेवना यांना देखील नोटीस पाठवण्यात आली आहे.
एकीकडे आसामनं शुक्रवारी मिझोराममधील पोलीस अधिकाऱ्यांना नोटीस पाठवली, तर दुसरीकडे मिझोरामनं चक्क आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्व सर्मा यांच्याविरुद्ध गुन्हाच दाखल केल्याचं जाहीर केलं. ज्या दिवशी गोळीबाराची घटना घडली, म्हणजेच २६ जुलै रोजीच आसामचे मुख्यमंत्री आणि इतर ६ अधिकाऱ्यांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती मिझोराम प्रशासनाकडून देण्यात आली आहे. यामध्ये हिमंता बिस्व सर्मा यांच्यासोबत आयजीपी अनुराग अगरवाल, डीआयडी कचर देवज्योती मुखर्जी, डीसी कचर किर्ती जल्ली, कचरचे डीएफओ सुन्यदेव चौधरी, कचरचे एसपी वैभव निंबाळकर, ढोलाई पोलीस स्थानकाचे ओसी साहब उद्दीन यांची नावं आहेत.
नेमकं प्रकरण काय?
आसाममधखील बराक घाटी परिसरातील कचार, करीमगंज आणि हाईलकांडीची १६४ किमीची सीमा मिझोरम राज्यातील आईजोल, कोलासीब आणि मामित जिल्ह्यांना लागते. जमीनीच्या कारणावरुन ऑगस्ट २०२० पासून आतंरराज्य सीमेवर संघर्ष सुरु झाला आहे. मिझोरमचे पोलीस महानिरीक्षक लालबियाकथांगा खिंगागते यांनी पीटीआयला दिलेल्या माहितीमध्ये वादग्रस्त भागात एटलांन नदीच्या जवळील भागात रात्री आठ झोपड्या जाळण्यात आल्याचं सांगितलं. हिमंता बिस्वा सर्मा आसामचे मुख्यमंत्री झाल्यानंतर संघर्ष वाढला आहे. गेल्यावर्षी झालेल्या संघर्षानंतर केंद्र सरकारनं हस्तक्षेप केला होता.