भडगाव (प्रतिनिधी) शहरातील गोविंद नगर जवळील रोडवर आर्थिक वादातून एकाच्या अंगावर दुचाकी घालून ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राहुल दिलीप देसले (रा. पिंपळगाव थडीचे ता.भडगाव) असे गुन्हा दाखल असलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.
या संदर्भात अधिक असे की, देविदास दौलत पाटील (वय ५०, रा.दौलत नगर) यांच्या मुलगा सिद्धार्थ याला राहुल देसले याने सन २०२१ मध्ये फोनवर जिवे मारण्याची धमकी दिली होती. यानंतर ४ ऑगस्ट रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास सिद्धार्थ हा त्याच्या ताब्यातील होंडा एव्हीटर गाडी क्रमांक (एमएच. १९ डी.जी. ५४६७) वर गोविंद नगर जवळील रोडवर उभा होता. यावेळी राहुल देसले याने त्यांच्या ताब्यातील काळ्या रंगाच्या विना क्रमांकाची गाडीने सिद्धार्थ यास जिवे ठार मारण्यच्या उद्देशाने जोरात धडक दिली. यात सिद्धार्थ जखमी झाला. या प्रकरणी राहुल देसलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात असून पुढील तपास पोउपनिरी गणेश वाघमारे हे करीत आहेत. दरम्यान, देविदास पाटील आणि राहुल देसले यांच्यात आर्थिक कारणातून वाद आहेत.
















