धरणगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील पिंप्री येथे गावातील दुकाने बंद करा म्हणत एकावर लोखंडी रॉडने प्राणघातक हल्ला चढवल्याप्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राहुल संतोष बोरसे (रा. माणिक चौक, पिंप्री खुर्द), असे गंभीर जखमीचे नाव आहे.
या संदर्भात सुवर्णा राहुल बोरसे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, अजय संजय भिल, रघुनाथ उर्फ गुड्डु रविंद्र गायकवाड, सागर प्रविण सोनवणे (सर्व रा. पिंप्री खु// ता. धरणगाव) आणि मुकेश मच्छिंद्र बागुल (रा. मांडळ ता. शिरपुर जि. धुळे) या चौघांनी दि. १८ रोजी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास पिंप्री गावातील दुकाने बंद करा असे जोर जोरात ओरडत आले.
यावेळी राहुल बोरसे हे घराचे जवळ उभे असतांना त्यांना चौघांनी तू येथे कसा काय उभा आहे?, असे बोलून चापटाबुक्यांनी मारहाण केली. तर अजय भिल याने राहुल यांच्या डोक्याला लोखंडी रोड मारून जिवेठार मारण्याचा प्रयत्न केला. तसेच येथेच मारुन टाकू असे धमकी दिली. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सपोनि जिभाऊ पाटील हे करीत आहेत.