अमळनेर(प्रतिनिधी) येथील वसुंधरा दशरथ लांडगे विश्वस्त,खा.शि.मंडळ अमळनेर, संचालिका, अर्बन बँक अमळनेर, शिक्षिका,साने गुरुजी विद्यालय अमळनेर यांना शिरपूर येथे स्व.चंद्रभागाबाई कंखरे बहुउद्देशीय संस्था शिरपूर व महाले प्रतिष्ठान धुळे यांच्या विद्यमाने “पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर राज्य आदर्श शिक्षिका पुरस्कार २०२२” शिरपूर येथील एस.एम.पटेल हाॅल आर.सी.पटेल फार्मसी कॉलेज करवंद नाका शिरपूर येथे प्रदान करण्यात आला.
यावेळी माजी नगराध्यक्ष भूपेश भाई पटेल, आमदार काशीराम पावरा, शिरपूर एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष राजगोपाल भंडारी, माजी नगराध्यक्ष प्रभाकर चव्हाण, किसान विद्या प्रसारक संस्थेच्या खजिनदार आशाताई रंधे, उद्यान पंडित बापूसाहेब ग.द.माळी गुरुजी शिक्षण संस्था शिरपूर येथील मोहन सोनवणे, कैलास कंखरे,मनोज धनगर, रामचंद्र ठाकरे,मा.नगरसेवक रोहित रंधे, दशरथ धनगर, धुळे ग.स.चे संचालक शशांक रंधे उपस्थित होते.महाराष्ट्र, गुजरात,म.प्रदेश, राजस्थान राज्यातील विविध जाती धर्माच्या ३८ शिक्षिकांना पुरस्कार प्रदान करण्यात आला.
तसेच वसुंधरा दशरथ लांडगे यांना जळगांव जिल्हा खाजगी शाळा शिक्षकेतर संघटना जळगांव व धनराज फाऊंडेशन यांच्या वतीने मंगळग्रह मंदिर अमळनेर येथे “जीवन गौरव”पुरस्कार त्यांच्या सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्याबद्दल प्रदान करण्यात आला.यावेळी धनराज विसपुते, संघटनेचे जिल्हाध्यक्ष मिलिंद जोशी, जळगांव ग.स.सोसायटीचे अध्यक्ष उदय बापू पाटील, संचालक अजय देशमुख, विश्वास पाटील, मंगेश भोईटे, माध्यमिक पतपेढीचे अध्यक्ष भिरुड दादा, संभाजी पाटील,ॲड.ललिताताई पाटील,आर.डी.पाटील योगेश भोईटे उपस्थित होते.वसुंधरा दशरथ लांडगे यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.