TheClearNews.Com
Sunday, September 13, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

शेतीमध्ये उत्पन्न वाढीसाठी मधमाश्यांचे महत्त्व – संजय मारणे

मधमाशी पालन विषयावर जनजागृती

vijay waghmare by vijay waghmare
February 15, 2026
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव प्रतिनिधी : शेतीमध्ये परागीभवनासाठी मधमाश्यांचे अनन्यसाधारण महत्त्व अधोरेखित करण्यात आले. फळबाग, भाजीपाला व तेलबिया पिकांमध्ये उत्पादन वाढीसाठी मधमाश्या अत्यंत उपयुक्त ठरतात, ज्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास मदत होते. असे पुणे येथील संचालक, इंडियन नॅचरल हनीबीज चे संजय मारणे यांनी मधमाश्यांचे विविध प्रकार, त्यांचे उत्पादने (By-products), बी व्हेनम (Bee Venom), परागीभवनाचे महत्त्व तसेच शेतीसाठी मधमाशी पालन कसे उपयुक्त आहे याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.

गांधी रिसर्च फाउंडेशन आणि जैन इरिगेशन सिस्टिम्स लि. यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मधमाशी पालन जनजागृती कार्यक्रम उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात एकूण ४० सहभागी उपस्थित होते. जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, सहव्यवस्थापकिय संचालक अजित जैन यांच्या मार्गदर्शना खाली हा कार्यक्रम घेण्यात आला. याप्रसंगी यवतमाळ कृषी महाविद्यालयाचे अध्यक्ष प्रदीप वादाफळे, अमरावती चे दिगंबर भुयार, नाशिक चे विजय चोंडेकर, सेवानिवृत्त सहाय्यक वनसंरक्षक पी. टी. पाटील, जामनेरचे प्रगतीशील शेतकरी एस आर पाटील, जैन इरिगेशन कृषी विभागाचे संजय सोन्नजे, एनर्जी पार्क सीएसओ दिपक चौधरी, गांधी रिसर्च फाऊंडेशन सुधीर पाटील, लक्ष्मण देशमुख, जैन इरिगेशन वन वन्यजीव पर्यावरण विभागाचे सल्लागाराचे राजेंद्र राणे उपस्थित होते.

READ ALSO

‘प्रकाशगाथा, महावितरणच्या मानव संसाधनाची’ पुस्तकाचे प्रकाशन

भुसावळात रेल्वे कर्मचाऱ्याचा निर्घुण खूण

मधमाश्यांचे प्रमुख प्रकार जसे की एपिस सेरेना इंडिका (Apis cerana indica), एपिस मेलिफेरा (Apis mellifera), एपिस डॉर्साटा (Apis dorsata), एपिस फ्लोरिया (Apis florea) तसेच डंखरहित मधमाश्या (Stingless Bees) यांची माहिती देण्यात आली. एपिस डॉर्साटा (Rock Bee) या मोठ्या आकाराच्या मधमाश्या असून त्या उंच झाडे व इमारतींवर उघड्यावर पोळे बांधतात. त्यांचे मध उत्पादन जास्त असते, परंतु त्यांचे नियंत्रित व्यवस्थापन करणे कठीण असते. एपिस फ्लोरिया (Little Bee) या लहान आकाराच्या मधमाश्या असून त्या झुडपांवर किंवा लहान फांद्यांवर पोळे बांधतात. त्यांचे मध उत्पादन कमी असले तरी परागीभवनात त्यांचा महत्त्वाचा वाटा असतो. तसेच मधमाश्यांपासून मिळणारी उपउत्पादने जसे की मध, मेण (Beeswax), परागकण (Pollen), रॉयल जेली, प्रोपोलिस आणि बी व्हेनम (Bee Venom) यांचे औषधी व आर्थिक महत्त्व स्पष्ट करण्यात आले.

शेतीमध्ये परागीभवनासाठी मधमाश्यांचे अनन्यसाधारण महत्त्व अधोरेखित करण्यात आले. फळबाग, भाजीपाला व तेलबिया पिकांमध्ये उत्पादन वाढीसाठी मधमाश्या अत्यंत उपयुक्त ठरतात, ज्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास मदत होते. “No Bees – No Food” ही संकल्पना स्पष्ट करत पर्यावरण संतुलनात मधमाश्यांची भूमिका विशद करण्यात आली.

मधमाशी पालनाची देखभाल (Maintenance), बॉक्स व्यवस्थापन, राणी मधमाशीचे महत्त्व, रोग नियंत्रण, हंगामी काळजी आणि शेतीपूरक व्यवसाय म्हणून मधमाशी पालन कसे फायदेशीर ठरते यावर सविस्तर माहिती देण्यात आली. कार्यक्रमाच्या शेवटी सर्व ४० सहभागींकडून मधमाशी संरक्षणाची शपथ (Oath) घेण्यात आली. सहभागीनी पुढीलप्रमाणे प्रतिज्ञा केली –

“मी मधमाश्यांचे संरक्षण करीन, पर्यावरणपूरक शेतीला प्रोत्साहन देईन, कीटकनाशकांचा योग्य व मर्यादित वापर करीन आणि ‘No Bees – No Food’ हा संदेश समाजात पोहोचवीन.”
उपस्थितांनी हा कार्यक्रम अत्यंत उपयुक्त व प्रेरणादायी असल्याचे मत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार राजेंद्र राणे यांनी केले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

‘प्रकाशगाथा, महावितरणच्या मानव संसाधनाची’ पुस्तकाचे प्रकाशन

September 12, 2026
गुन्हे

भुसावळात रेल्वे कर्मचाऱ्याचा निर्घुण खूण

September 12, 2026
गुन्हे

हरिद्वारचा साधू असल्याचे सांगत वृद्धाच्या हातातून अंगठी लंपास

September 11, 2026
गुन्हे

वाहतुक पोलिसांच्या सर्तकतेमुळे मोबाईल चोरट्यांना रंगेहाथ पकडले

September 11, 2026
जळगाव

एआय’ मोड्यूलने महावितरणचा वीजचोरांवर सर्जिकल स्ट्राईक; ३ महिन्यांत २८ हजार वीजचोऱ्यांचा पर्दाफाश

September 10, 2026
जळगाव

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
Next Post

अफवांवर विश्वास न ठेवता स्मार्ट वीजमीटर बसवा : पालकमंत्री गुलाबराव पाटील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

राष्ट्रपती राजवटीवर राज्यपाल घेणार मोठा निर्णय ?

June 26, 2022

धानोरा विद्यालयात ‘बाल विवाह मुक्त जनजागृती अभियान’ अंतर्गत विवीध कार्यक्रम उत्साहात !

December 10, 2023

शिवसेना-भाजप कार्यकर्ते आमने-सामने ; शिवसेना भवनसमोर तुफान राडा

June 16, 2021

राज्यसभा निवडणूक : गिरीश महाजनांच्या स्वीय सहाय्यकाने लावलेल्या पैजेची राज्यभर चर्चा !

June 11, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group