धरणगाव (प्रतिनिधी) येथील शहीद भगतसिंग मित्र मंडळातर्फे शहीद दिनानिमित्त महान क्रांतिवीर शहीद भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांच्या प्रतिमेला माल्यार्पण व पुष्पांजली अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते शहीद भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले. उपस्थित सर्वांनी शहिदांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केले. याप्रसंगी विकल्प ऑर्गनायझेशन चे कार्याध्यक्ष लक्ष्मण पाटील यांनी शहिदांच्या कार्याबद्दल माहिती दिली. इश्क और क्रांती का अंजाम एक हि हो तो, रांझा बनने से अच्छा भगतसिंग, सुखदेव और राजगुरू बन जाओ…!, असे प्रतिपादन लक्ष्मण पाटील यांनी केले. भाजपा गटनेते कैलास माळी सरांनी देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात प्राणार्पण करणाऱ्या वीरांचे कार्य कायम स्मरणात ठेवले पाहिजे. तसेच आजच्या नवयुवकांनी या वीरांच्या जीवनातून आदर्श घेऊन वाटचाल करावी, असे भावनिक आवाहन माळी सरांनी केली. चर्मकार महासंघाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष भानुदास विसावे यांनी शहीद दिनाचे महत्व सांगितले. कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल शहीद भगतसिंग मित्र मंडळाचे भानुदास विसावे यांनी कौतुक केले.
शहीद दिनाच्या कार्यक्रम प्रसंगी राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे कार्याध्यक्ष भानुदास विसावे, भाजपा गटनेते कैलास माळी, शिव व्याख्याते लक्ष्यमन पाटील, सामाजिक कार्यकर्ते हेमंत चौधरी, जेष्ट पत्रकार विजय शुक्ला, काँग्रेस चे विजय जनकवार शहीद भगतसिंग मित्र मंडळाचे अध्यक्ष सुदर्शन भागवत, मयूर बागुल, शिंपी समाज तालुकाध्यक्ष जितेंद्र जगताप, खुशाल मांडगे, महेंद्र चव्हाण, प्रशांत जगताप, पप्पू सोनार, गणेश मराठे, प्रमोद जगताप, शरद दाणेज, विकास मोरावकर, विशाल सोनार, चेतन शिंपी, राज जगताप, निलेश तांबट आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार अमोल सोनार यांनी केले.















