चाळीसगाव (प्रतिनिधी) येथील रेल्वे स्थानकावर प्लॉटफार्म क्रमांक दोनवर अति जलद मुंबई-नागपूर दुरांतो एक्सप्रेससमोर एकाचवेळी तरुण व तरुणीने उडी मारली. त्यात तरुणीचा जागीच मृत्यु झाला आहे तर तरुण गंभीर जखमी झाला असून त्याचे दोन्ही पाय कापले गेले आहेत.
तालुक्यातील तरुण तरुणी यांनी रागाच्या भरात चाळीसगाव रेल्वे स्टेशन गाठले. त्यानंतर चाळीसगाव रेल्वे स्थानकावर डाऊन प्लॉट क्रमांक दोनवर गुरुवारी रात्री १.१० वाजेपूर्वी मुंबईकडून नागपूरकडे जाणाऱ्या अतिजलद दुरांतो एक्स्प्रेससमोर या दोघांनी उडी घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यात तरुणीचा जागीच मृत्यू झाला तर तरुण गंभीर जखमी झाला आहे. त्याचे दोघं पाय कापले गेले आहेत. दुरांतो एक्सप्रेसचे लोको पायलट मीरावली यांनी त्वरित चाळीसगाव रेल्वे पोलिस स्टेशनला घटनेची माहिती दिली. पोलिकांनी दोघांना चाळीसगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी जखमी तरुणीस तपासून मृत घोषीत केले तर गंभीर जखमी झालेल्या तरुणावर उपचार सुरू आहेत. मृत मुलगी व जखमी मुलगा एका जगावातील असून पोलिसांनी त्यांची नावे उघड केलेली नाहीत. जखमी तरुणावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.