जळगाव (प्रतिनिधी) जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहकारी समाज मर्यादीत संस्थेच्या मुख्य कार्यालयात भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३० व्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले.
यावेळी उपस्थित लोकसंघर्ष मोर्चाच्या अध्यक्ष प्रतिभा ताई शिंदे ज.जि.मविप्रचे संचालक ॲड. विजय भास्करराव पाटील, जळगाव मनपा माजी नगरसेवक सुनील भैया माळी, लोकसंघर्ष मोर्चाचे सचिन धांडे, देविदास ठाकरे, अमोल कोल्हे, एस एन पाटील यांनी महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटोला माल्यार्पण करून अभिवादन केले.