जळगाव (प्रतिनिधी) शारीरिक व मानसिक आरोग्याच्या तंदुरुस्तीसाठी स्थापन करण्यात आलेल्या हरि ॐ माॅर्निंग वाॅक गृपच्या माध्यमातून दरवर्षी डिसेंबर महिन्यातील एका रविवारी तरसोद पायीवारीचे आयोजन करण्यात येते. पायीवारीचे हे १७ वे वर्ष होते.
सकारात्मकता व जीवनातील आनंदासाठी हरि ॐ मॉर्निंग गृप नियमीतपणे अनेकविध उपक्रम राबवित असतो. सकाळी पायी फिरण्यासोबतच व्यायाम, प्राणायाम केले जातात. गतवर्षातील सुख-समाधान व आनंदासाठी कृतज्ञता व्यक्त करणे तसेच येणाऱ्या नवीन वर्षात गणरायाने आशीर्वाद द्यावा यासाठीची प्रार्थना करण्यासाठी डिसेंबर महिन्यात तरसोद पायी वारीचे आयोजन करण्यात येते.
सकाळी ६ वाजता शहरातील विविध भागातील सदस्य पायी चालत अजिंठा चौफुली येथे एकत्रित आलेत व तेथून गणपती बाप्पा मोरया असा गजर करीत तरसोद पायीवारीची सुरुवात झाली. गोदावरी इंजिनिअरिंग काॅलेजजवळ चहापान करुन वारी पुढे मार्गस्थ झाली. रस्त्याने चालताना दोन-चार जणांच्या गटात सर्व सदस्य शिस्तीत चालत होते. त्यामुळे रस्त्यावर गर्दी होत नव्हती. चालताना गणपती बाप्पा मोरया व हरि ॐ चा गजर सुरु होता. गणपती मंदिरात पोहोचल्यावर सामुहिक प्रार्थना व त्यानंतर अल्पोपहार करुन उपक्रमाची उत्साहात सांगता झाली. गृपचे सदस्य कमलेश वासवानी यांना जन्मदिनानिमित्त शुभेच्छा देण्यात आल्या.
यावर्षीच्या पायी वारीत सुरेश प्रीतमणि, राजेश हिंगु, राजू कोचर, जानीभाई कटारिया, शंकर मंधान, घन:श्याम अडवाणी, राजेश जेवलानी, नविन आमलानी, हासानंद मंधान, राजेश बूटवानी, भुवनेश्वरसिंग, कमलेश वासवानी, अनिल नाथानी, विनोद मराठे, जितेंद्र हिंगु, राकेश वालेचा, अप्पा नेवे, नंदकुमार जयस्वाल, राजू नेमाडे, प्रकाश नागदेव, लक्ष्मण बाविस्कर, भारत कपूर, ऋषि कपूर, अरुण निकुंभ, हेमंत कोल्हे, संदीप हेमनानी, सुरेश चोथमल, प्रणिल हिंगु, गिरीश कुळकर्णी आदी सहभागी होते.