धरणगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील साकरे येथील बा. च. भाटिया माध्यमिक विद्यालयात केंद्र सरकारच्या निती आयोगामार्फत सुरू होणारी अटल टिंकरिंग लॅब ग्रामीण विद्यार्थ्यांना लाभलेली एक सुवर्णसंधी आहे. ग्रामीण विद्यार्थ्यांनी आपल्या अंगी असलेली अफाट कल्पनाशक्तीचा वापर करून तंत्रज्ञानाच्या साह्याने स्वतःचे व्यक्तिमत्व फुलवावे अनेक नवनवीन प्रयोग करून समाजोपयोगी संशोधनाला चालना द्यावी असे आवाहन खासदार उन्मेष दादा पाटील यांनी केले. ते साकरे ता. धरणगाव येथील बा. च. भाटिया माध्यमिक विद्यालयात अटल टिंकरिंग लॅबच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संचालक राजेंद्र नन्नवरे होते. वनसंपदा बहुउद्देशीय मंडळाच्या साकरे येथील शाळेतील स्व. बाळासाहेब आपटे प्रयोग शाळेत निती आयोगामार्फत ग्रामीण विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीला चालना मिळावी नवनवीन प्रयोगामार्फत शोध निर्माण व्हावेत म्हणून अटल टिंकरिंग लॅबला काही निकषांच्या आधारावर मान्यता देण्यात आली. यात विद्यार्थ्यांच्या संशोधक वृत्तीला चालना मिळावी या दृष्टीने आवश्यक असणारी तंत्रज्ञानावर आधारित सर्व किट्स थ्रीडी प्रिंटर केंद्र सरकारकडून उपलब्ध करून दिली जातात.
यावेळी शाळेतील लिपिक प्रभाकर आनंदा पाटील व त्यांच्या सुविद्य पत्नी सुरेखा पाटील यांचा सेवापूर्तीबद्दल खासदार उन्मेश दादा यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. धरणगाव येथील विवेकानंद शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष हेमलाल भाटिया सचिव प्रा. रमेश महाजन यांनीही व प्रभाकर पाटील यांचा सत्कार केला. शाळेच्या मुख्याध्यापिका अनिता चंद्रशेखर पाटील क्रीडा शिक्षक के एस पाटील यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल तर शाळेचा माजी विद्यार्थी जयेश देशमुख याची पायलट प्रशिक्षणासाठी झालेल्या निवडीबद्दल तर क. ब. चौ. उ. म. विद्यापीठाचे माजी कुलगुरू प्राध्यापक डॉ. पी. पी. पाटील यांच्या वतीने दरवर्षी इयत्ता दहावीत प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यांना रु. २१००/- बक्षीस दिले जाते कोरोनामुळे दोन वर्षांची राहिलेली ही बक्षिसे मान्यवरांच्या हस्ते देण्यात आली.
यांची होती उपस्थिती
कार्यक्रमाला प्रमुखात अतिथी म्हणून विद्याभारतीचे प्रांत मंत्री श्री प्रकाश पोतदार, प्राचार्या सौ. शैला पोतदार, अ.भा. विद्यार्थी परिषदेचे प्रांत उपाध्यक्ष प्राध्यापक डॉ. मनीष जोशी, जिल्हा परिषद सदस्या माधुरी अत्तरदे, नगरसेवक चंद्रशेखर उत्तरदे, माजी जिल्हा परिषद सदस्या वैशाली पाटील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डी. जी. पाटील, धरणगावच्या विवेकानंद शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष हेमलाल भाटिया, सचिव प्रा. रमेश महाजन, मुख्याध्यापक एस. एस. पाटील, एरंडोल येथील ग्रामीण उन्नती शाखेचे सचिव सचिन विसपुते, मुख्याध्यापिका अंजू चव्हाण, रावेरच्या किलबिल शाळेच्या मुख्याध्यापिका नयना निलेश पाटील, अमळनेरच्या खान्देश शिक्षण मंडळाचे संचालक नीरज अग्रवाल, प्राध्यापक डॉ. धीरज वैष्णव, भाजपचे जेष्ठ नेते सुभाष अण्णा पाटील, तालुकाध्यक्ष जिजाबराव पाटील, शहराध्यक्ष दिलीप महाजन, कन्हैया रायपूरकर, अ.भा.वी.प. चे संघटन मंत्री शुभम स्वामी, महेश ढगे, इच्छेश काबरा, आर्यन सैंदाणे, वेदांत भट धरणगाव श्री बालाजी वाहन मंडळाचे चंद्रकांत अमृतकर, प्रमोद जगताप, विलास येवले, अरुण महाले, वनसंपदा मंडळाचे अध्यक्ष दिलीप रामू पाटील, संचालक ऍड. प्रदीप कुलकर्णी, माजी आमदार स्मिता वाघ, पंढरीनाथ पाटील, संजय पाटील, खुशाल पाटील, साकरे येथील सरपंच शरद पाटील, पोलीस पाटील घनश्याम पाटील, जयदीप पाटील, जगतराव नाना पाटील, कंडारीचे भिका पटेल, ग्रामपंचायत विकास सोसायटीचे सर्व पदाधिकारी व कंडारी निमझरी साकरेतील ग्रामस्थ प्रभाकर पाटील यांचे नातेवाईक व महिलांची लक्षणीय उपस्थिती होती.
भावनाविवश सत्कार
97 वर्षे वय असलेल्या प्रभाकर पाटील यांच्या मातोश्री श्रीमती ठगूबाई आनंदा पाटील याही कार्यक्रमाला उपस्थित आहेत हे पाहून खासदार उन्मेश दादा पाटील मुख्याध्यापिका अनिता पाटील व मान्यवरांनी प्रेक्षकांमध्ये जाऊन त्यांच्या सत्कार केला यावेळी सर्वच सभागृह भावना विवश झाले. भारत माता, सरस्वती देवी, अटल बिहारी वाजपेयी, शास्त्रज्ञ सी व्ही रमण, स्व. बाळासाहेब आपटे यांच्या प्रतिमा पूजन व दीप प्रज्वलन करून लॅबचे उद्घाटन करण्यात आले. विद्यार्थ्यांना इशस्तवन व स्वागत गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष दिलीप दादा पाटील यांनी केले तर सूत्रसंचालन शिक्षक मनोज गुजर यांनी केले अटल लॅब याबद्दल शिक्षक राजेश्वर न्हायदे व विद्यार्थ्यांनी कु विद्या सोनवणे यांनी माहिती दिली.
यावेळी प्रमुखातिथी श्री प्रकाश पोतदार, सेवानिवृत्त लिपिक प्रभाकर पाटील व कार्यक्रमाचे अध्यक्ष राजेंद्र नन्नवरे यांनी समयोचित मनोगत व्यक्त केले. शाळेच्या शिक्षिका मनीषा शिंदे यांनी आभार व्यक्त केले सामूहिक पसायदानाने कार्यक्रमाचे सांगता झाली. शाळेचा रम्य परिसर, कार्यक्रमाचे आखीव रेखीव व भव्य आयोजन पंचक्रोशीतील नागरिक व महिलांची लक्षणीय उपस्थिती याबद्दल सर्वच अतिथींनी समाधान व्यक्त केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी साकरे ग्रामपंचायतचे रमेश पाटील व शाळेतील शिक्षक वृंद विद्यार्थी व विद्यार्थिनी यांनी मेहनत घेतली.