साकळी ता.यावल (प्रतिनिधी) येथील जय दुर्गा मित्र मंडळ, बाजारपेठ मंडळातर्फे दुर्गा उत्सवानिमित्ताने (दि.२३ते २४ ऑक्टोंबर) रोजी दोन दिवसीय ‘ घरीच किल्ले बनवा स्पर्धा ‘ आयोजित करण्यात आलेली होती. ही स्पर्धा तब्बल ३५ तासांच्या जवळपास चालली. अतिशय अभिनव व नाविन्यपूर्ण संकल्पितस्पर्धा मंडळाच्या वतीने ‘पहिल्यांदाच’ राबविली गेली असून या स्पर्धेत अथर्व वाणी याने प्रथम क्रमांक मिळविला आहे.
तर गावातही अशा प्रकारची स्पर्धा राबवणारे जय दुर्गा मित्र मंडळ हे ‘ एकमेव ‘ मंडळ ठरले आहे. या स्पर्धेमुळे बाजारपेठेभाग अक्षरशः शिवमय वातावरणाने भारावून गेलेला होता. कोरोना आजाराचा संसर्ग लक्षात घेऊनच ही स्पर्धा घरोघरी राबवण्याचा निर्णय मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या होता.
तर मग……चला आपण आपल्या घरीच कुटुंबासंगे “गड-किल्ला” बनवूया! या ‘ टॅगलाईन ‘ खाली सुंदर गड-किल्ले बनवा स्पर्धा-२०२० घेण्यात आली. या स्पर्धेत अकरा स्पर्धकांनी भाग घेऊन ” शिवप्रिय ” शिवनेरी तोरणा,रायगड, राजगड, जलदुर्ग जंजिरा, प्रतापगड अशा विविध प्रकारच्या किल्ल्यांच्या प्रतिकृती दगड ,माती, विटा, गोणपाट यासह विविध पर्यावरण पूरक घटकांचा वापर करून साकारण्यात आल्या. या स्पर्धेत अथर्व विवेकानंद वाणी यांने प्रथम क्रमांक मिळविला असून द्वितीय क्रमांक विभागून अदित्य गणेश नेवे व अदित्य मनोज नेवे तर तृतीय क्रमांक विभागून वेदांत चंद्रकांत नेवे व भुवन दामोदर नेवे यांनी मिळविला आहे.तसेच गितेश नेवे, पियुष वाणी,भुवनेश नेवे,कु. भाविका नेवे, कुणाल नेवे या स्पर्धकांना उत्तेजनार्थ बक्षिस मिळविले आहे.
या स्पर्धेचे परीक्षण अडावद येथील शिवअभ्यासक लक्ष्मण पाटील यांनी केले. सर्व स्पर्धकांना बक्षीस वितरण कार्यक्रमात साकळी विकासोचे संचालक सुनिल नेवे, ग्रामपंचायत सदस्य निलिमा नेवे महिला उद्योजिका शोभा नेवे, वर्षा नेवे, मंगला नेवे, अलका चित्रे या मान्यवरांच्या हस्ते स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र व रोख बक्षीस देऊन गौरवण्यात आले. ही अनोखी स्पर्धा राबविल्याने मंडळाच्या कार्यक्षेत्रात उत्साहाचे व नवचैतन्याचे तसेच घराघरात ‘शिवमय’ वातावरण निर्मिती झाल्याची अनुभूती येत होती. स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे दि.२४ रोजी किल्ल्यांचे बांधकाम पूर्ण करून अप्रतिम असे सजवण्यात आले.
गड- किल्ले बनवितांना त्या वास्तूतील बारकावे जसे गुप्तद्वार, गुप्तवाट, मुख्यरस्ता, खंदके, बुरुज, तळमाथा, पाण्याची व्यवस्था, मजबूत तटबंदी, पायथ्याशी असलेले गाव, घनदाट जंगल यासह सर्व बारीकसुरीक बाबीं दाखवण्यात आल्या होत्या. गड-किल्ले शिवप्रेमी नागरिकांना पाहण्यासाठी खुली करण्यात आली. स्पर्धकांनी स्पर्धेत उत्तम असा सहभाग नोंदवून छत्रपतीं शिवरायांच्या पावन व अजरामर इतिहासाला उजाळा दिला.