जळगाव(प्रतिनिधी) : महाराष्ट्र योगा असोसिएशनतर्फे ४१ वी राज्यस्तरीय स्पर्धा श्रीरामपूर जिल्हा अहमदनगर येथे आयोजित केलेल्या आहेत. जिल्हास्तरीय स्पर्धेत पात्र विवीध गटातील खेळाडूंना राज्यस्तरीय योगासन स्पर्धेत सहभागी होण्याची संधी मिळाली आहे. राज्यस्तरावरील निवड झालेल्या खेळाडूंना योग फेडरेशन ऑफ इंडियाच्या फीरोजपुर (पंजाब) येथील राष्ट्रिय योगासन स्पर्धेसाठी पाठविले जाईल. ह्या खेळाडूंना आंतररष्ट्रीय योगतज्ञ व प्रशिक्षक डॉ. अनिता पाटील यांचं मार्गदर्शन लाभले आहे.
विविध गटातील मुलींचा संघ
नंदिनी दुसाने, ऐश्वर्या खडके, हर्षाली वीरकर, विजेता कावडिया, दिया भागवानी, जानवी सोमाणी, विधी वर्मा, अश्विनी खरात, कौशिकी चौबे, महती सूर्यवंशी, रेश्मा खडके, निलिमा बोरसे
मुलांचा संघ
आदित्य दुसाने, आदित्य मिस्त्री, दीपक पाटील, प्रसाद बाविस्कर, मानराज चौधरी, अबीर चौबे, अक्षय नेहे, द्रुपद बोरसे, परीक्षित पाटील