TheClearNews.Com
Monday, September 14, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

सवलतीच्या रोपांअभावी वृक्षारोपणाला अडथळा; मराठी प्रतिष्ठानकडून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

vijay waghmare by vijay waghmare
June 17, 2025
in जळगाव, जिल्हा प्रशासन
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) सवलतीच्या दरात रोप उपलब्ध न झाल्याने वृक्ष रोपणातील अडचणी आणि पर्यावरण संवर्धनाबाबत मराठी प्रतिष्ठानचे अध्यक्ष ॲड. जमील देशपांडे यांनी जळगाव जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे.

मराठी प्रतिष्ठानचे अध्यक्ष ॲड. जमील देशपांडे यांनी निवेदनात म्हटले आहे की, मराठी प्रतिष्ठान, जळगाव यांच्या वतीने आम्ही आपणास विनम्रपणे पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने एका गंभीर समस्येकडे लक्ष वेधू इच्छितो. वन विभागाकडून दरवर्षी १५ जूनच्या सुमारास सवलतीच्या दरात रोप उपलब्ध करून देण्याबाबत शासन निर्णय जाहीर होतो. परंतु, यंदा अद्याप हा निर्णय जाहीर झालेला नाही आणि सवलतीच्या दरात रोप उपलब्ध होत नसल्याने वृक्षारोपण करणाऱ्या सामाजिक संस्था, स्वयंसेवी गट आणि पर्यावरणप्रेमी नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.

READ ALSO

दागिन्यांसाठी मावशीचा गळा आवळून खून

व्याहीकडे आलेल्या वृद्ध महिलेच्या बॅगेतून सोन्याचे दागिने लंपास

शासन एकीकडे ‘एक पेड़ माँ के नाम’ आणि इतर मोहिमांद्वारे वृक्षारोपणाला प्रोत्साहन देण्यासाठी मोठ्या प्रमाणात जाहिरात करते. यामुळे नागरिकांमध्ये पर्यावरण संवर्धनाबाबत जागरूकता निर्माण झाली आहे, ही स्वागतार्ह बाब आहे. परंतु, वन विभागाकडून सवलतीच्या दरात रोप उपलब्ध न झाल्याने वृक्षारोपणाच्या उत्साहाला खीळ बसत आहे. यामुळे स्थानिक पातळीवर वृक्षारोपणाच्या उपक्रमांना खीळ बसत असून, पर्यावरण संरक्षणाचे उद्दिष्ट साध्य होण्यास अडथळा निर्माण होत आहे.

पर्यावरणाचे महत्त्व सर्वज्ञात आहे. वृक्षारोपणामुळे मातीचे संवर्धन, जलसंधारण, जैवविविधतेचे रक्षण आणि कार्बन उत्सर्जन कमी करणे शक्य होते. यामुळे हवामान बदलाचा सामना करण्यासाठी वृक्षारोपण हा एक प्रभावी उपाय आहे. परंतु, रोपांच्या उपलब्धतेअभावी नागरिकांचा उत्साह कमी होत आहे, ज्यामुळे शासनाच्या पर्यावरण संवर्धनाच्या धोरणांवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.

याबाबत आपण तातडीने लक्ष द्यावे तसेच सवलतीच्या दरात रोप उपलब्ध करून देण्याबाबत तातडीने शासन निर्णय जाहीर करावा याबाबत पाठपुरावा करावा. वन विभागाला रोपवाटिकांमधून दर्जेदार रोपांचा पुरवठा त्वरित सुरू करण्याचे निर्देश द्यावेत. स्थानिक स्वयंसेवी संस्था आणि नागरिकांना वृक्षारोपणासाठी प्रोत्साहन देण्यासाठी समन्वय समिती स्थापन करावी.वृक्षारोपण मोहिमेच्या यशस्वीततेसाठी पारदर्शक आणि कार्यक्षम यंत्रणा विकसित करावी.

आम्ही आपणास विनंती करतो की, या समस्येचे गांभीर्य लक्षात घेऊन तातडीने कार्यवाही करावी, जेणेकरून पर्यावरण संवर्धनाच्या कार्याला गती मिळेल आणि नागरिकांचा विश्वास शासनावर कायम राहील. आपल्या सकारात्मक प्रतिसादाची अपेक्षा आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

दागिन्यांसाठी मावशीचा गळा आवळून खून

September 14, 2026
गुन्हे

व्याहीकडे आलेल्या वृद्ध महिलेच्या बॅगेतून सोन्याचे दागिने लंपास

September 14, 2026
गुन्हे

खिडकीच्या जागेतून दुकानात शिरला चोर; २० हजारांची भांडी लंपास !

September 13, 2026
जळगाव

Weekly Horoscope साप्ताहिक राशीभविष्य 13 सप्टेंबर ते 19 सप्टेंबर 2026 !

September 13, 2026
जळगाव

‘प्रकाशगाथा, महावितरणच्या मानव संसाधनाची’ पुस्तकाचे प्रकाशन

September 12, 2026
गुन्हे

भुसावळात रेल्वे कर्मचाऱ्याचा निर्घुण खूण

September 12, 2026
Next Post

घरात घुसून तरूणीला मारण्याची धमकी देत वृध्देला मारहाण !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

अर्ज करताच मिळणार नवीन घरगुती वीजजोडणी

June 16, 2021

पत्रकार सूर्यकांत कदम यांना पत्रकार भूषण पुरस्कार

October 18, 2022

जिल्हा प्रशासन, नेहरू युवा केंद्राच्या स्पर्धेत राष्ट्रभक्तीच्या ज्वलंत भाषणांनी जागविला युवा !

December 7, 2021

चटईचे दाणे, कुलर्स तयार करणाऱ्या कंपनीला आग

May 25, 2026
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group