जळगाव (प्रतिनिधी) आपले ग्राहक तोडत असल्याच्या किरकोळ वादातून दोघांनी पिता-पुत्रावर हल्ला चढवल्याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शुक्रवारी रात्री जगवानी नगरात ही घटना घडली.
या संदर्भात अधिक असे की, अविनाश बन्सी पाटील (वय ५०) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांचा मुलगा राहुल याने ठीबकचा व्यवसाय सुरू केला होता. याचा राग आल्यामुळे शुक्रवारी रात्री यागेश देशमुख व विक्की माळी (दोघांचे पुर्ण नाव माहित नाही) हे दोघे श्री.पाटील यांच्या घराबाहेर आले. तु व्यवसाय सुरू केल्यामुळे आमचे ग्राहक तोडतो आहे, असे म्हणत पाटील पिता-पुत्रावर हल्ला चढवला. यात अविनाश पाटील यांना दगड व स्टीलच्या रॉडने मारहाण करण्यात आल्यामुळे ते जखमी झाले. दरम्यान, श्री. पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.