जळगाव (प्रतिनिधी) शहरातील बहिणाबाई उद्यानाजवळ अट्टल मोटारसायकल चोरट्याला स्थानिक गुन्हे शाखेच्या (एलसीबी) पथकाने ३ जानेवारी रोजी अटक केली आहे. पुढील कारवाईसाठी जिल्हा पेठ पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
जळगाव शहर आणि जामनेर व पहूर या भागात संशयित आरोपी मनोज अशोक मराठे रा. पळासखेडा ता. जामनेर हा मोटारसायकली चोरत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. त्यानुसार पोलीस अधिक्षक डॉ. प्रविण मुंढे, अपर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांनी ३ जानेवारी रोजी संशयित आरोपी मनोज मराठे हा शहरातील बहिणाबाई उद्यानाजवळ असल्याची गोपनिय माहिती मिळाली. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक फौजदार अशोक महाजन, पोहेकॉ शरीफ काझी, युनुस शेख, किशोर राठोड, विनोद पाटील, रणजित जाधव, मुरलीधर बारी, अशोक पाटील यांनी कारवाई करत संशयित आरोपी मनोज मराठे याला बहिणाबाई उद्यानापासून अटक करण्यात आली. तसेच मनोज मराठे याने जिल्हा पेठ हद्दीतील पल्सर मोटार सायकल चोरून नेल्याचे कबुल केले असून चोरीची दुचाकी धुळे शहरात विकल्याचे सांगितले.
















