चोपडा (प्रतिनिधी) येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दि. २२ मार्च रोजी अट्टल मोटारसायकल चोरट्यांना चोरीच्या मोटर सायकल, पिस्टल आणि जिवंत काडतुसह अटक करण्यात आली आहे.
प्रवीण भागवत कोळी (रा. बोरअजंति ता. चोपडा), जगन बरेला (रा. जामठी ता. वरला जि. सेंधवा) असे आरोपींची नावे आहे.
याबाबत वृत्त असे की, चोपड़ा बस स्टॅन्ड परिसरात एक व्यक्ती देशी बनावट पिस्टल कमरेला लावून चोरीच्या मोटर सायकलसह असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेतील पो नि किरण कुमार बकाले यांना मिळाल्याने त्यांनी पो हे का रवींद्र गायकवाड, पो हे का अनिल देशमुख, पो हे का कमलाकर बागुल, पो हे कॉ सुरज पाटील, पो हे कॉ प्रदीप पाटील, चालक -पो हे कॉ राजेन्द्र पवार या पथकास पाठवून त्यास ताब्यात घेण्याच्या सुचना दिल्या. त्यानुसार पथकाने बस स्टॅन्ड परिसरात जाऊन माहितीनुसार व्यक्तीची खात्री करून त्यास ताब्यात घेऊन त्याच्या विरुद्ध चोपडा शहर पोलीस स्टेशनला पो हे कॉ सुरज पाटील यानी रितसर फिर्याद देऊन त्यास चोरीच्या मोटर सायकलसह पिस्टल व जिवंत काडतुस या मुद्देमालासह ताब्यात घेतले. याप्रकरणी पुढील तपास कामी चोपडा शहर पोलीस स्टेशन यांच्या ताब्यात वैद्यकीय तपासणी करून दिले.