धरणगाव (प्रतिनिधी) शहरातील एका तरुणासोबत धक्कादायक प्रकार घडला आहे. एका महिलेनं पीडित व्यक्तीला ‘सेक्सटॉर्शन’च्या (sextrotion) जाळ्यात अडकवून त्याच्याकडून खंडणी उकळण्याचा प्रयत्न केला. विशेष म्हणजे धरण्गावातील काही लोकांसोबत याआधी देखील न्यूड व्हिडीओ कॉल (nude vdo call) केल्याचे प्रकार घडले आहेत.
नेमकं काय घडलं !
पीडित तरुणाला काही दिवसांपूर्वी व्हॉट्सअॅपवर काही मेसेज केले होते. आरोपी महिलेनं पीडित तरूणासोबत मैत्री केली. यानंतर अचानक तिने शनिवारी रात्री दहा ते साडेदहाच्या दरम्यान पिडीत तरुणाला विवस्त्र (न्यूड) अवस्थेत व्हिडीओ कॉल केला. दरम्यान, तिने पीडित तरुणाला व्हिडीओ फ्रेममध्ये घेऊन संबंधित कॉल रेकॉर्ड केला. व्हिडीओ कॉलनंतर आरोपी महिलेनं पीडित व्यक्तीला व्हाइस कॉल केला आणि पैशांची मागणी केली. परंतू पिडीत तरुणाने पोलिसात तक्रार करण्याची धमकी दिल्यामुळे आरोपी महिलेचे व अन्य एकाचे येणारे कॉल बंद झाले आहेत. दरम्यान, धरणगावातील तरुणांसह मध्यमवयीन लोकांना न्यूड कॉल येण्याचे प्रमाण वाढले आहे.
सेक्सटॉर्शनचे म्हणजे काय
आजकाल सायबर ठग लैंगिक ब्लॅकमेलिंग म्हणजेच सेक्सटोर्शनद्वारे लोकांकडून पैसे उकळत आहेत. सेक्सटॉर्शनचे म्हणजे वेबकॅम, मोबाईल किंवा व्हिडिओ कॉलद्वारे एखाद्या व्यक्तीच्या लैंगिक क्रियाकलाप किंवा नग्न चित्रे रेकॉर्ड करून ब्लॅकमेल करणे. शाळा-महाविद्यालयात शिकणारे तरुण, व्यापारी, राजकारणाशी निगडित लोक या रॅकेटचे बळी ठरतात.
या गोष्टी लक्षात ठेवा, फसवणूक टाळा
पॉर्न साइट्स सर्फ करू नका. फक्त सुरक्षित वेबसाइट उघडा. ज्या वेबसाइट्सच्या URL च्या आधी लॉक असेल त्यांना भेट द्या. लाल लॉकने चिन्हांकित केलेली वेबसाइट उघडणे टाळा. फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारण्यापूर्वी ती नीट तपासा. कोणी ब्लॅकमेल करत असेल, तर सायबर पोलिसांकडे तक्रार करा. अनोळखी लोकांशी संबंध ठेवताना काळजी घ्या.