भुसावळ (प्रतिनिधी) शहरातील जामनेर रोड येथील दीनदयाल नगरातील सार्वजनिक शौचालय जवळील रोडवर सार्वजनिक ठिकाणी एकाने तरुणावर चाकूने वार करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात अरबाज विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुलाम गौस कालू शाहा (वय २३ रा. मुस्लिम कॉलनी बोहरे मशिदीजवळ, भुसावळ) याने दिलेल्या फिर्यादीनुसार, दि. ३१ जानेवारी २०२२ रोजी ८.३० वाजेच्या सुमारास भुसावळ शहरातील जामनेर रोड येथील दीनदयाल नगरातील सार्वजनिक शौचालय जवळील रोडवर सार्वजनिक ठिकाणी अरबाज (पूर्ण नाव माहित नाही रा. भुसावळ) याने जुन्या भांडण्याच्या रागातून जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने गुलाम गौस कालू शाहा याला पाठीवर, छातीवर, छातीच्या खाली चाकूने वार करून गंभीर दुखापत केली. याप्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात अरबाज विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि हरीश भोये करीत आहे.