मेरठ (वृत्तसंस्था) तरुणाला आपल्या काकीसोबत अनैतिक संबंध ठेवायचे होते. काकीने प्रतिकार केल्याने तरुणाने चाकूने भोसकून तिची हत्या केली. ही घटना उत्तर प्रदेशातील मेरठमध्ये घडली आहे. घटना घडली त्यावेळी काकी घरात एकटीच होती. पोलिसांनी अवघ्या १२ तासांत या घटनेचा छडा लावला. आरोपीला अटक करण्यात आली आहे. तसेच तरुणाने गुन्ह्याची कबुली दिली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपीला आपल्या काकीसोबत अनैतिक संबंध ठेवायचे होते. याआधीही त्याने दोनदा महिलेसोबत अनैतिक संबंध ठेवण्याचे प्रयत्न केले होते. मात्र, त्यावेळी महिलेने विरोध केला. गुरुवारी तिची दोन्ही मुले कॉलेजला गेली होती. त्याचवेळी तरूण घरात घुसला. त्याने तिच्यावर बलात्काराचा प्रयत्न केला. त्याला तिने जोरदार प्रतिकार केला. तसेच त्याच्या कानशिलात लगावली. या घटनेबाबत कुटुंबीयांना सांगेन असे ती म्हणाली. त्यावेळी तरुणाला राग अनावर झाला आणि त्याने चाकूने भोसकून तिची हत्या केली. आरोपीने काकीवर चाकूने वार केले. तिच्या मानेवर आणि शरीरावर गंभीर जखमा झाल्या. रक्तस्राव झाल्याने तिचा जागेवरच मृत्यू झाला. या घटनेने कुटुंबीयांना मोठा मानसिक धक्का बसला आहे.
या घटनेनंतर आरोपी फरार झाला. या घटनेची माहिती मिळताच पोलीस तिथे पोहोचले. पोलिसांनी अवघ्या १२ तासांत या घटनेचा छडा लावला. १२ तासांत आरोपीला गावातूनच अटक केली. त्याची कसून चौकशी केली असता, त्याने गुन्ह्याची कबुली दिली.
















