मुंबई (वृत्तसंस्था) निलंबित केलेल्या भाजपच्या सर्व १२ आमदारांनी भगतसिंग कोश्यारी यांची राजभवनात जाऊन भेट घेतली. राज्यपालांची भेट घेतल्यानंतर भाजपा आमदारांनी घेतलेल्या पत्रकारपरिषदेत भाजपा नेते आशिष शेलार यांनी ठाकरे सरकारवर टीका केली. लोकशाही मूल्यांची आज ठाकरे सरकारने अंत्ययात्रा काढली. भाजपाच्या आमदारांना निलंबित करण्याचं षडयंत्र सरकारने रचलं असल्याचा आरोप शेलार यांनी केला.
विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांना धक्काबुक्की आणि शिवीगाळ केल्याप्रकरणी भाजपच्या बारा आमदारांचं वर्षभरासाठी निलंबन करण्यात आलं. यानंतर या बारा आमदारांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची राजभवनात जाऊन भेट घेतली. कायदेशीर प्रक्रिया करून योग्य निर्णय घेणार असल्याचं आश्वासन राज्यपालांनी दिल्याची माहिती भाजप नेते आशिष शेलार यांनी दिलीय. विधान भवनात षडयंत्र रचले गेलं असून याबाबत राज्यपालांनी अहवाल मागवावा अशी मागणी केल्याचं त्यांनी सांगितलं.
राज्यपालांची भेट घेतल्यानंतर भाजपा आमदारांनी घेतलेल्या पत्रकारपरिषदेत भाजपा नेते आशिष शेलार यांनी ठाकरे सरकारवर टीका केली. लोकशाही मूल्यांची आज ठाकरे सरकारने अंत्ययात्रा काढली. भाजपाच्या आमदारांना निलंबित करण्याचं षडयंत्र सरकारने रचलं असल्याचा आरोप शेलार यांनी केला.
भाजपाच्या कुठल्याही सदस्याने कुठलाही अपशब्द उच्चारला नाही. तरीही जी कारवाई केली ती एकतर्फा केली आहे. आम्हाला आमचं म्हणणं मांडू दिलेलं नाही. काहीजणांकडून सोशल मीडियावर पसरवले जात असलेल्या व्हिडीओमध्ये असं कुठेही दिसून येत नाही की, भाजप आमदारांनी सभागृहाचा किंवा तालिका अध्यक्षांचा अवमान केलाय. लोकशाही मूल्यांची आज अंत्ययात्रा या ठाकरे सरकारने काढली, या मुस्कटदाबीला आम्ही घाबरणार नाही.” असंही शेलार यांनी सांगितलं.