चोपडा (प्रतिनिधी) — शहरातील चोपडा एज्युकेशन सोसायटीच्या प्रताप विध्या मंदिराच्या १०७ वा वर्धापन दिनाचा कार्यक्रम नुकताच पार पडला या कार्यक्रमात दर वर्षी अनेक शिक्षकांना हा पुरस्कार दिला जातो यावेळी मात्र छोट्या प्रताप विध्या मंदिराच्या शिक्षिका सौ.मिनाक्षी मोहन वसाने यांना यंदाचा संध्याताई मयूर “प्रज्ञावंत पुरस्कार” संस्थेचे सचिव माधुरिताई मयूर व कार्यक्रमाचे प्रमुख पाहूणे प्रसिद्ध लेखक प्रा.मिलिंद जोशी तसेच इतर मान्यवराच्या हस्ते प्रदान करण्यात आला.या पुरस्काराचे स्वरूप ११००० रुपये रोख बक्षीस आणि स्मृती चिन्ह प्रदान करण्यात आले. या पुरस्कार वितरणाच्या वेळी प्रताप विध्या मंदिराचे चेअरमन राजाभाई मयूर तर शहरातील पिपल्स बँकेचे चेअरमन चंद्रहास गुजराथी, विश्वनाथ अग्रवाल, पिपल्स बँकेचे निवृत्त मॅनेजर श्री जैन,भूपेंद्र गुजराथी असे विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते तर प्रार्थमिक विभागाचे मुख्यध्यापक सुनिल पाटील सर ,पी पी पाटील सह प्रताप विध्या मंदिराचे सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते या पुरस्कारा बद्दल शहरातून अनेकांनी कौतुक केले तर समाजातील मच्छिंद्र महाले सर ,डॉ.ललित सैंदाणे, सैंदानेसर, उमाकांत निकम,आधार वसाने नाना, देविदास सोनवणे,हिरालाल सोनवणे,सोपान बाविस्कर,अश्या अनेक मान्यवरानी शुभेच्छा दिल्या आहेत.