TheClearNews.Com
Saturday, May 16, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांचा “संघर्ष दिव्यांग मित्र पुरस्कार” देऊन सन्मान

दिव्यांग अपंग कल्याण बहुद्देशीय संस्था, सामाजिक संघटनांच्या वतीने प्रदान

The Clear News Desk by The Clear News Desk
January 9, 2022
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) आमच्या जळगावच्या या ‘सिव्हिल हॉस्पिटल’ ला कधी नव्हे इतके सुवर्ण दिवस आपल्या काळात आलेत. तासनतास रांगेत उभे राहणे, गर्दीचा प्रचंड त्रास, लक्ष देणारे कोणी नाही असे दिव्यांग बांधवांचे होणारे विविध हाल थांबल्याने आम्ही आपला गौरव करीत आहोत, अशा भावनिक शब्दात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांचा “संघर्ष दिव्यांग मित्र पुरस्कार” देऊन त्यांच्या कार्याचा विविध संस्थांच्या उपस्थितीत सन्मान करण्यात आला.

येथील दिव्यांग अपंग कल्याण बहुद्देशीय संस्थेतर्फे आणि सामाजिक संघटनांच्या सहकार्याने जळगावकरांच्या वतीने छोटेखानी कार्यक्रमात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांचा गौरवशाली कामगिरीबद्दल स्मृतिचिन्ह, शाल देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी उप अधिष्ठाता डॉ. किशोर इंगोले, वैद्यकीय अधिक्षक डॉ. विजय गायकवाड, नेत्रशल्यचिकित्सा विभाग प्रमुख तथा आर्या फाउंडेशन अध्यक्ष डॉ. धर्मेंद्र पाटील, दिव्यांग अपंग कल्याण बहुद्देशीय संस्थेचे अध्यक्ष गणेश पाटील उपस्थित होते.

READ ALSO

नराधम मुख्याध्यापकाचा चिमुरडीवर अत्याचार

जैन इरिगेशन सिस्टीम्सची दमदार कामगिरी…

अध्यक्ष गणेश पाटील यांनी मानपत्राचे वाचन केले. मानपत्रात त्यांनी सांगितले की, आपणास “संघर्ष दिव्यांग पुरस्कार” देतांना आम्हाला अतिशय आनंद आहे. आपण आमच्या जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात येऊन त्याचा कायापालट केला. येथील नियोजन व व्यवस्थापन पारदर्शकपणे करून शिस्तशीर कारभार निर्माण केला. तसेच महाविद्यालय व रुग्णालयात सुशोभीकरण आणि स्वच्छता विषयक केलेल्या कामामुळे त्याची दाखल घेत दिल्लीच्या संस्थेने ‘फेस इंडिया ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’ पुरस्कार देऊन रुग्णालयाला गौरविले.

दिव्यांग बांधवांना त्रास न होता दिव्यांग प्रमाणपत्र मिळणे सोईचे व्हावे यासाठी आपण विचारविनिमय करून तसेच सूचना मागवत पारदर्शक कुपन प्रणाली सुरु केली. यामुळे दिव्यांग बांधवाना थेट ‘अपॉइंटमेंट’ मिळाल्याने दिलासा मिळाला. यासोबत दिव्यांग मंडळामधून अनेक चांगले निर्णय घेतले. रुग्णसेवा करताना रुग्णांशी आपुलकीचे संबंध प्रस्थापित करणारे आपण कौतुकास पात्र आहेत. सरकारी दरबारी आपणासारखे कर्तव्यदक्ष, शिस्तशीर आणि कठोर अधिकारी मिळणे हे दुर्मिळ झाले आहे. आपल्या कार्यास सलाम करून आम्ही जळगाववासियांतर्फे करीत असलेला आपला गौरव करीत आहोत.

यानंतर मानपत्र, स्मृतिचिन्ह, शाल देऊन डॉ. जयप्रकाश रामानंद यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी उप अधिष्ठाता डॉ. किशोर इंगोले यांनी संस्थेच्या वतीने मनोगत व्यक्त केले. यावेळी डॉ. रामानंद यांनी पुरस्काराला उत्तरं देताना सांगितले की, दिव्यांग बांधवांना प्रमाणपत्र वितरित करण्यासाठी राज्यभर अडचणी आहेत. मात्र आपण जळगावात एकही अडचण ठेवली नाही. ‘तत्काळ प्रकरण, लवकर वितरण’ यानुसार दिव्यांग बांधवांच्या समस्या सोडविल्या. रुग्णसेवा सुलभ व्हावी यासाठी शिस्तबद्ध रचनेवर कायम भर राहणार आहे.

यावेळी रोहिणी इंगोले, लोकमित्र फाउंडेशनचे शेखर वैद्य, किशोर नेवे, जितू पाटील, अक्षय महाजन, सामाजिक कार्यकर्त्या दीपाली कासार,राजेंद्र वाणी, सचिन पाटील, संताराम एकशिंगे, महाविद्यालय व रुग्णालयाचे जनसंपर्क सहाय्यक विश्वजित चौधरी उपस्थित होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

नराधम मुख्याध्यापकाचा चिमुरडीवर अत्याचार

May 16, 2026
जळगाव

जैन इरिगेशन सिस्टीम्सची दमदार कामगिरी…

May 15, 2026
गुन्हे

भरधाव डंपरच्या धडकेत दोन आदिवासी युवक ठार

May 15, 2026
गुन्हे

दरमहा परतावा देण्याचे अमिष ! गुंतवणूकदारांची 23 कोटी रुपयांत केली फसवणूक

May 15, 2026
एरंडोल

एरंडोल बस स्थानकाजवळ भीषण अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार

May 15, 2026
गुन्हे

बंद घर फोडून दीड लाखांचे दागिने लंपास

May 14, 2026
Next Post

CORONA : राज्यात कठोर निर्बंध लागू ; जाणून घ्या.. काय राहणार सुरू अन् काय बंद?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

संत शिरोमणी सेवालाल महाराज यांच्या जयंतीनिमित्त आ. मंगेशदादा चव्हाण यांनी दिल्या समाज बांधवांना शुभेच्छा !

February 15, 2024

आसोदा शिवारात रेल्वेरुळाखाली कुजलेला मृतदेह आढळला ; तालुका पोलिसात नोंद

March 18, 2021

बीएचआर घोटाळा : सीए महावीर जैनने मागितली वैद्यकीय उपचारासाठी परवानगी !

January 27, 2021

धरणगाव स्वस्त धान्य दुकानदार संघटनेच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा प्रतापराव पाटील यांच्याकडून सत्कार !

February 9, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group