नागपूर (वृत्तसंस्था) मामीने अल्पवयीन भाच्याचे वारंवार लैंगिक शोषण (abused) केल्याची धक्कादायक घटना पारशिवनी येथे उघडकीस आली. या घटनेने पोलिसांमध्ये (Police) खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी 21 वर्षीय मामीविरुद्ध (aunty) गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगा दहाव्या वर्गात शिकतो. त्याचे वडील मोलमजुरीचे काम करतात. दोन वर्षांआधी पीडित मुलगा आपल्या मामाकडे गेला, तेव्हा मामीने पीडित भाच्याला अश्लील व्हिडिओ दाखवून त्याचे पहिल्यांदा लैंगिक शोषण केले. मामी यावरच थांबली नाही तिने घटनेचे स्वतःच्या मोबाईलमध्ये चित्रीकरण करून घेतले. त्यानंतर पीडित हा आपल्या घरी परत आला. मात्र मामीने पीडित भाच्याशी मोबाइलवर संपर्क साधून त्याचे चित्रीकरण व्हायरल करण्याची धमकी दिली. त्यानंतर वारंवार घरी बोलावून त्याचे लैंगिक शोषण करणे सुरू ठेवले.
भाच्यावर वारंवार लैंगिक शोषण
चार महिन्यांपूर्वीच आरोपी मामीचा पतीसोबत वाद झाला तेव्हा ती आपल्या माहेरी राहायला गेली. तेथे देखील त्या मामीने आपल्या भाच्याला बोलून त्याचे वारंवार लैंगिक शोषण केले. अखेर मामीचा त्रास असह्य झाल्यामुळे पीडित मुलाने आपल्या नातेवाईकांना याबाबत माहिती दिली. नातेवाईकांनी मुलासह पारशिवनी पोलीस स्टेशन गाठून तक्रार दिली. पोलिसांनी पीडित मुलाच्या तक्रारीवरून ठार मारण्याची धमकी देणे व बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा कायद्याच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला. परंतु, पोस्को कायद्याअंतर्गत पोलिसांनी हा गुन्हा नोंदविला असल्याने पोलीस तपासामध्ये देखील अत्यंत गुप्तता पाळत असल्याचे पाहायला मिळत आहे. आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर व सविस्तर तपास केल्यानंतर पोलिसांकडून रीतसर माहिती दिली जाणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिली.
















