जळगाव (प्रतिनिधी) पत्रकार संतोष सूर्यवंशी यांना 2019-2020 साठीचा म.य. उपाख्य बाबा दळवी राज्यस्तरीय शोधपत्रकारिता पुरस्कार देण्यात आला. नागपूर येथे नुकताच हा सोहळा झाला. 20 हजार रोख, स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
‘दैनिक लोकमत’कडून नागपूर येथे आयोजित या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेना नेते खासदार संजय राऊत, माजी खासदार विजय दर्डा, माजी शिक्षण मंत्री राजेंद्र दर्डा, ‘द वायर’ चे संस्थापक संपादक सिद्धार्थ वरदराजन, नागपूरच्या विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे उपस्थित होते. संतोष सूर्यवंशी यांनी “आदिवासी जात प्रमाणपत्र अडकले दलालीच्या विळख्यात” आणि “व्यथा ड़ायलिसिसच्या रुग्णांची” या दोन वृत्त मालिका लावून होणारी पिळवणूक समोर आणली होती. याची दखल घेत त्यांना हा राज्यस्तरीय पुरस्कार देण्यात आला आहे. पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.