मुंबई (वृत्तसंस्था) सगळ्या इंडस्ट्रीनं मिळून आपला कचरा साफ करायला हवा. नाहीतर हा त्यांच्यासाठी देखील आत्मघातक ठरेल, असे मत योगगुरू बाबा रामदेव यांनी व्यक्त केले. बॉलिवूडमध्ये जे ड्रग्जचं विनाशकारी प्रकार चाललाय, तो भारतातील युवा पिढीसाठी फार धोकादायक असल्याचंही ते म्हणाले.
योगगुरू रामदेव बाबा त्यांच्या भूमिका आणि विधानांमुळे कायम चर्चेत असतात. त्यांनी घेतलेल्या राजकीय भूमिका विशेष चर्चेत राहिल्या आहेत. नुकतंच त्यांनी बॉलिवूड, ड्रग्स आणि आर्यन खान या प्रकरणी प्रतिक्रिया दिली आहे. रामदेव बाबा यांना प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी बॉलिवूडमध्ये सध्या चर्चेत असलेल्या ड्रग्ज प्रकरणी प्रश्न विचारले. या प्रश्नावर उत्तर देताना रामदेव बाबा म्हणाले, “बॉलिवूडमध्ये जे ड्रग्जचं विनाशकारी प्रकार चाललाय, तो भारतातील युवा पिढीसाठी फार धोकादायक आहे. नशा करण्याला ग्लॅमराईज केलं जातंय. ज्यांना आदर्श मानलं जायचं, ते लोक देखील या प्रकारच्या कट-कारस्थानात फसलेले दिसतात, तेव्हा लोकांना चुकीची प्रेरणा मिळते,” असे रामदेव बाबांनी सांगितले.
सगळ्या इंडस्ट्रीनं मिळून आपला कचरा साफ करायला हवा. नाहीतर हा त्यांच्यासाठी देखील आत्मघातक ठरेल. मी तर योगाच्या माध्यमातून रोगमुक्ती, नशामुक्ती किंवा सर्व प्रकारच्या चुकीच्या गोष्टींचं निराकरण करण्याचा प्रयत्न करत असतो. योगमुळे व्यक्तीच्या शरीर, इंद्रीये आणि मनाची शुद्धी होते. त्यामुळे निश्चितरित्या माणूस हा पुढे जातो,” असेही ते म्हणाले.