कासोदा ता. एरंडोल (प्रतिनिधी) पदोन्नतीमध्ये मागासवर्गीयांना आरक्षण देण्यात यावे, अशी मागणी रिपाइंचे एरंडोल तालुकाध्यक्ष प्रविण बाविस्कर यांनी राज्य सरकारकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा भारताचे केंद्रीय मंत्री ना. रामदास आठवले यांच्या आदेशाने तसेच प्रभारी प्रदेश उपाध्यक्ष रमेश मकासरे, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष राजाभाऊ कापसे, जळगाव जिल्हाअध्यक्ष आनंद खरात यांच्या मार्गदर्शनाखाली एरंडोल तालुकाध्यक्ष प्रविण बाविस्कर, तालुका सचिव देवानंद बेहेरे यांचे नेतृत्वाने एरंडोल तहसीलदार शिरसाठ साहेब यांची भेट घेऊन वरील विषयी निवेदन देण्यात आले.
निवेदनात म्हटलं आहे की, सर्वोच्च न्यायालयाने पदोन्नतीमध्ये आरक्षण देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेण्याचे निर्देश दिलेले असतांना मात्र महाराष्ट्र राज्य महाविकास आघाडी सरकार हे किती ही पुरोगामी म्हणणारे सरकार असले तरी पदोन्नतीमधील मागासवर्गीय यांच्या आरक्षण प्रश्नांनी महविकास आघाडीचा बुरखा फाटला आहे. महविकास आघाडी सरकार हे गोर गरीब मागासवर्गीय आणि दीन दलित विरोधी सरकार ठरले आहे. तरी एरंडोल तालुक्यातील शासकीय, निमशासकीय, शाळा, महाविद्यालये यामधील मागासवर्गीयांना पदोन्नतीमध्ये आरक्षण देण्याचा निर्णय राज्य सरकारने त्वरित घ्यावा. अन्यथा संघटनातर्फे तीव्र आदोलंन करण्यात येईल, असे यात म्हंटले आहे.
या प्रसंगी रिपाईचे एरंडोल तालुकाध्यक्ष प्रविण बाविस्कर, तालुका सचिव देवानंद बेहेरे, जितेंद्र वाघ, गजानन पाटील, सिताराम मराठे, इमरान महेमिलखान आदी पदाधिकारी उपस्थित होते.