जळगाव (प्रतिनिधी) उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्यावर दि. २५ जुलै रोजी गोळीबार केल्याच्या प्रकरणात अटकेत असलेले पाच संशयितांचा जामीन अर्ज आज जिल्हा न्यायालयाने फेटाळून लावला आहे. दरम्यान, फरार संशयीताचाही अटकपुर्व जामीनही फेटाळून लावण्यात आला आहे.
यासंदर्भात अधिक असे की, उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्यावर रविवार २५ जुलै रोजी रात्री दहाच्या सुमारास इनोव्हा कार मधुन आलेल्या हल्लेखोरांनी गोळीबार केल्याचा गुन्हा रामानंदनगर पोलिसांत दाखल होता. रामानंदनगर पोलीसांनी वेगवेगळ्या ठिकाणाहुन गुन्ह्यातील संशयितांना अटक केली हेाती. त्यात मंगलसिंग युवराज राजपूत (वय-३२), किरण शरद राजपूत (वय-२४), उमेश पांडुरंग राजपूत (वय-२१), महेंद्र राजपूत (सर्व रा. पिंप्राळा) आणि जुगल संजय बागुल (वय २२ रा. मयुर हौसिंग सोसायटी, खोटेनगर) अशांना अटक झाली. पोलिस केाठडीची मुदत संपल्यावर सर्व संशयितांना कारागृहात रवानगी झाली आहे.
दरम्यान, गुन्ह्यात भुषण गौतम बिऱ्हाडे हा संशयित आरोपी फरार असुन त्याच्यावतीने अटकपुर्व जामीन दाखल करण्यात आला हेाता. तो, न्यायालयाने फेटाळला आहे. त्याच बरोबर कारागृहात न्यायालयीन कोठडीत असलेल्या पाच संशयीतांनी जिल्हा सत्र न्यायालयात दाखल केलेल्या जामीन अर्जावर कामकाज होवुन देान्ही पक्षांचा युक्तीवाद झाला. सरकार पक्षातर्फे अडॅ. रमाकांत सोनवणे यांनी तर मुळ फिर्यादीतर्फे ॲड. मुकेश शिंपी यांनी कामकाज पाहिले.