TheClearNews.Com
Friday, February 13, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

शिवसेनेच्या ऊर्दू कॅलेंडरवर बाळासाहेबांचा ‘जनाब’ उल्लेख; भाजपची टीका

The Clear News Desk by The Clear News Desk
January 1, 2021
in राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

मुंबई (वृत्तसंस्था) काँग्रेस-राष्ट्रवादीशी हातमिळवणी करून महाविकास आघाडी स्थापन करणाऱ्या शिवसेनेला भाजपनं पुन्हा एकदा हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून लक्ष्य केलं आहे. शिवसेनेच्या उर्दू कॅलेंडरमध्ये बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख ‘जनाब’ आणि छत्रपती शिवाजी महाराज जयंतीचा उल्लेख ‘शिवाजी जयंती’ केल्याने, भाजप आमदार अतुल भाताळकर यांनी शिवसेनेवर हल्लाबोल केलाय.

शिवसेनेच्या उर्दू कॅलेंडरमध्ये बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख जनाब आणि छत्रपती शिवाजी महाराज जयंतीचा उल्लेख ‘शिवाजी जयंती’ असा केल्याने, भाजपने हल्लाबोल केला. “शिवसेनेने हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुखांना जनाब बाळासाहेब म्हणून वैचारिक सुंता करून घ्यावी तो त्याचा अंतर्गत प्रश्न आहे, परंतु अवघ्या देशाचे आराध्य असलेल्या शिवरायांची छत्रपती ही बिरुदावली काढणारे तुम्ही कोण? महाराष्ट्राची जनता तुमची खेटराने पूजा केल्याशिवाय राहणार नाही”, असा हल्लाबोल भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी केला. शिवसेनेच्या वडाळा विधानसभा क्षेत्रातील कार्यकर्त्यांनी नवीन वर्षाचं कॅलेंडर छापलं आहे. हे कॅलेंडर उर्दू भाषेतील आहे. यामध्ये बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख जनाब असा करण्यात आला आहे. उर्दू भाषेत बाळासाहेबांना जनाब म्हटल्याने भाजपने आक्रमक पवित्रा घेतला. शिवाय छत्रपती शिवरायांच्या जयंतीवरुनही भाजपने निशाणा साधला.

READ ALSO

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

अतुल भातखळकर यांनी सोशल मीडियावर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. अतुल भातखळकर म्हणाले, “शिवसेनेने एक महिन्यापूर्वी अजान स्पर्धा घेतली. तेव्हाच मी म्हटलं होतं, शिवसेनेने भगवा तर सोडलाच, पण हिरवा हाती घेणं बाकी आहे. आता तर वडाळा विधानसभेच्या शिवसेनेने चक्क उर्दूमध्ये नव्या वर्षाचं कॅलेंडर काढलं. एव्हढंच नव्हे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं नामकरण करुन हिंदुहृदयसम्राट ऐवजी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंचा उल्लेख जनाब बाळासाहेब असा उल्लेख केला. उर्दू आणि मुस्लिम कॅलेंडरप्रमाणे, चंद्रोदय, सूर्योदय देण्याचं काम केलं. एव्हढंच नव्हे छत्रपती शिवाजी महारांजाच्या जयंतीच्या दिवशी फक्त शिवाजी जयंती असा एकेरी उल्लेख करण्याचं धाडस सुद्धा या कॅलेंडरमधून करण्यात आला आहे. याचा मी निषेध करतोच. औरंगाबादचं संभाजीनगर नाही, पण हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंचं नामकरण जनाब बाळासाहेब ठाकरे असं मतांच्या राजकारणासाठी शिवसेनेने करुन दाखवलं”

शिवसेनाप्रमुखांना ‘जनाब बाळासाहेब’ म्हणून शिवसेनेनं वैचारिक सुंता करून घ्यावी, तो त्याचा अंतर्गत प्रश्न आहे, परंतु अवघ्या देशाचे आराध्य दैवत असलेल्या शिवरायांची छत्रपती ही बिरुदावली काढणारे तुम्ही कोण? महाराष्ट्राची जनता तुमची खेटराने पूजा केल्याशिवाय राहणार नाही,’ असा इशाराही भातखळकर यांनी दिला आहे. शिवसेनेला हिंदुत्वाच्या सर्टिफिकेटची गरज नाही, असा खोचक टोलाही त्यांनी हाणला आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
राज्य

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

February 1, 2026
जळगाव

एआय ते हाय व्हॅल्यू क्रॉप्स, सरकारच्या मोठ्या घोषणा, आता अंमलबजावणीकडे लक्ष- अशोक जैन

February 1, 2026
जळगाव

जळगाव शहरातील मतदार यादीत एकाच व्यक्तीचे १७ वेळा नाव !

December 5, 2025
राज्य

महाराष्ट्र राज्याला राष्ट्रीय जल पुरस्कारात देशात प्रथम क्रमांकाचा सन्मान !

November 12, 2025
राज्य

मोठी बातमी : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर ; असा असणार निवडणूक कार्यक्रम

November 4, 2025
Next Post

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ आयोजित रक्तदान शिबिरात ५१ दात्यांनी केले रक्तदान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

मुख्यमंत्र्यांचा पीए बोलतोय…तुम्हाला सोडणार नाही ; गुलाबराव वाघ यांना जीवे मारण्याची धमकी ! (व्हिडीओ)

July 2, 2022

भाजपा व्यापारी आघाडीच्या जिल्हाध्यक्षपदी अडावदचे उमेश कासट यांची निवड !

December 23, 2023

उपमुख्यमंत्री फडणवीस यांना भेटणार; संजय राऊत

November 10, 2022

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांना श्रद्धांजली

July 31, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group