मुंबई (वृत्तसंस्था) लालबाग परिसरात दोन महिन्यापूर्वी झालेल्या वीणा जैन यांच्या खून खटल्याशी संबंधी धक्कादायक माहिती पोलिसांच्या आरोपपत्रातून नुकतीच समोर आली आहे. मुलीनं रागाच्या भरात आपल्या जन्मदात्या आईचा खून केला. तसेच आईचे डोकं आणि धड दोन साड्यांमध्ये गुंडाळून ते प्लॅस्टिकच्या पिशवीत टाकत कपाटाच्या खालच्या कप्प्यात तर बाथरूममधील स्टीलच्या टाकीत वीणा यांच्या शरीराचे इतर अवयव कापून लपवून ठेवले होते. रिंपल जैन (वय २४) हिच्यावर तिची आई वीणा जैन (वय ५५) यांची हत्या केल्याचा आरोप आहे.
नेमकं काय होतं प्रकरण !
लालबाग येथे राहणाऱ्या वीणा जैन यांच्या हत्या प्रकरणात अटक करण्यात आलेली त्यांची मुलगी रिम्पल हिला क्राइम पेट्रोल पाहण्याची आवड होती. हीच गुन्हे मालिका पाहून तिने आईची हत्या करत तुकडे केल्याचीही धक्कादायक माहिती समोर आली होती. आईला रागाच्या भरात तीक्ष्ण हत्याराने ठार मारून तिच्या मृतदेहाचे तुकडे तुकडे करून अडीच महिने घरातच लपवून ठेवल्याची भयंकर घटना 14 मार्चला लालबागपरिसरात उजेडात आली होती. या प्रकरणात आता पोलिसांनी कोर्टात आरोपपत्र दाखल केले असून त्यात धक्कादायक माहिती समोर आली आहे. 55 वर्षीय विना जैन मृत्यू प्रकरणी शवविच्छेदनात गळा दाबल्याचे पुरावे सापडले आहेत. फॉरेन्सिक तपासणीत असे दिसून आले आहे की, तिचा मृत्यू डोक्याला दुखापत झाल्यामुळे झाला आहे. तसेच रिंपलने वीणा जैन यांचा गळा जोराने दाबल्यामुळे त्यांच्या मानेचे हाड तुटले असावे. तसेच रिंपलने वीणा जैन यांच्या मृत्यूपूर्वी त्यांना बेदम मारले असावे, असाही संशय आहे.
२०० अत्तराच्या बॉटल आणि रुम फ्रेशनर आणले !
दरम्यान, २७ नोव्हेंबर रोजी रिंपलने तिच्या आईचा खून केल्यानंतर तिने मृतदेहाचे तुकडे करुन ते घरात विविध ठिकाणी ठेवले होते. तब्बल तीन महिने तिने हे हत्याकांड लपवलं होतं. मृतदेहाची दुर्गंधी घालवण्यासाठी तिने २०० अत्तराच्या बॉटल तसंच रुम फ्रेशनर आणले होते. रिंपलने तिच्या आईच्या मृतदेहाचे लहान-लहान तुकडे बाथरुममधून गटारात टाकले होते. या तुकड्यांमुळे घरातील बाथरुम तुंबलं होतं. बाथरुममधून मृतदेहाचे तुकडे बाहेर जातील असं तिला वाटलं होतं, पण त्याने बाथरुम तुंबलं होते. दोन महिन्यांपासून वीणा चाळीत कुठेच दिसत नव्हत्या.
चाळीतील लोकांनी मोठ्या भाऊला कळविल्यानंतर उघड झाली घटना !
चाळीतील लोकांनी तसे वीणा जैन यांचे मोठे भाऊ सुरेशकुमार पोरवाल यांना कळवले. घरी पोहचल्यावर संशय आल्याने पोरवाल यांच्या मुलाने दरवाजा तोडून खोलीत प्रवेश केला. तेव्हा वीणा तिथे दिसल्या नाहीत. आई कानपूरला गेल्याचे रिम्पलने सांगितले. अखेरीस पोरवाल कुटुंबीयांनी रात्री पोलिस ठाण्यात वीणा जैन बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली होती. बारावीपर्यंतच शिकलेल्या रिम्पलने इलेक्ट्रिक मार्बल कटर, कोयता आणि चाकू यांचा वापर करत आईच्या मृतदेहाचे तुकडे केले हे पुढे पोलीस तपासात समोर आले. या संदर्भात काळाचौकी आता पोलिसांनी 350 पानी आरोपपत्र दाखल केले आहे.
पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न !
पोलिसांनी 14 मार्च रोजी वीणाच्या शरीराचे पूर्ण कुजलेले अवयव जप्त केले. त्या वेळी गोळा केलेल्या पुराव्याच्या आधारे पोलिसांनी रिंपलविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला होता. जैन यांच्या घरातून त्यावेळी दोन संगमरवरी कटर, एक विळा, एक हातोडा, चाकू आणि एक पेव्हर ब्लॉक सापडला होता अन तेच पुरावे या घटनेत पुढे महत्त्वाचे ठरले आहेत. रिंपलने तिची आई पहिल्या मजल्यावरील सार्वजनिक शौचालयात जात असताना खाली पडल्याचे म्हटले होते. यामध्ये तिचा मृत्यू झाल्यानंतर नातेवाईक माझ्यावर संशय घेत मलाच जबाबदार धरतील म्हणून मी घाबरून तिच्या मृतदेहाची विल्हेवाटीसाठी तुकडे केल्याचे रिंपलने म्हटले होते. कोर्टही तिने निर्दोष असल्याचा पुनरुच्चार केला आणि निर्दोष असल्याचे म्हटलं आहे.
घरभर पसरलेली दुर्गंधी होती !
पोलिसांचे पथक चाळीतील घरी पोहोचले तेव्हा त्यांनी लोखंडी कपाटाच्या तळघरात विना जैन यांच्या मृतदेहाचा एक भाग कुजलेल्या अवस्थेत एका प्लास्टिकच्या गोणीत आढळून आला. त्यानंतर संपूर्ण घराची झाडाझडती घेतल्यावर बाथरूममध्ये स्टीलच्या टाकीत दोन वेगवेगळ्या साडीत डोके व धड गुंडाळलेले अवस्थेत पोलिसांना सापडले होते. पोलीस जैन यांच्या घरात गेल्यावर घरभर दुर्गंधी पसरलेली होती. किडे लागलेल्या अवस्थेत हे सर्व तुकडे केईएममध्ये पाठविण्यात आले होते.















