यावल (प्रतिनिधी) तालुक्यातील वढोदा येथे एका भामट्याने पॉलिश करून देतो या बहाण्याने वृद्ध महिलेची ५० हजारांची सोन्याची पोत लंपास केली. याप्रकरणी यावल पोलिसांत गुन्हा दाखल झालाय.
वढोदा येथील सुरेश नामदेव चौधरी यांनी यावल पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यात जुने भांडे, दागिने पॉलिश करून देतो अशी बतावणी करणारा एक जण त्यांच्या घरी आला. पत्नी उज्वला यांनी त्याच्याकडून पितळी व तांब्याच्या भांड्यांना पॉलिश करून घेतले. नंतर त्याने सोन्याचे दागिन्यांनाही पॉलिश करून देतो असे सांगितले. उज्वला चौधरींनी ५० हजार रूपये किमतीची अडीच तोळ्याची सोन पोत पॉलिश करण्यासाठी दिली. त्यानंतर भामट्याने हातचलाखीने पोत घेत पोबारा केला.















