धरणगाव(प्रतिनिधी) तालुक्यातील बोरखेडा येथे एका ६५ वर्षीय वृद्धाला शिवीगाळ करीत मारहाण केल्या प्रकरणी ६ जणावर धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे की, तालुक्यातील बोरखेडा येथील वसंत जयराम पाटील(वय ६५) यांच्या शेतात दि २४ रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास संशयित आरोपी स्वप्नील गोरख पाटील, गोरख जयराम पाटील, अरुण जयराम पाटील, आशाबाई गोरख पाटील, लताबाई गोरख पाटील, अतुल अरुण पाटील, सर्व रा.बोरखेडा या सर्वांनी एकत्र येत शेतात बैलगाडी आणून जोर जोरात शिवीगाळ करीत वृद्धाला जबर मारहाण केली. या प्रकरणी धरणगाव पोलिसात ६ जणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ.मोती पवार हे करीत आहेत.