धरणगाव(प्रतिनिधी) तालुक्यातील बोरखेडा येथे शुल्लक कारणातून एकाला मारहाण झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी धरणगाव पोलिसात चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे की, दि २४ रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास स्वप्नील गोरख पाटील(वय २३) यांचे वडील यांना त्यांच्याच प्लॉटमध्ये जाण्यास रस्ता न दिल्याने त्यांनी याची विचारणा केली. याचा राग आल्याने त्यांना वसंत जयराम पाटील, समाधान वसंत पाटील, राहुल वसंत पाटील, बेबाबाई वसंत पाटील यांनी काठीने मारहाण केली. या प्रकरणी धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोहेकॉ मोती पवार हे करीत आहेत.