पारोळा : प्रतिनिधी
शहरातील एका परिसरातील २० वर्षीय विवाहितेच्या घरात घुसून विनयभंग करीत तिच्या पतीला मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी पारोळा पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे की, शहरातील एका परीसात पतीसोबत वास्तव्यास असलेल्या २० वर्षीय विवाहिता दि. ३० रोजी पती घरी नसताना संशयित आरोपी चेतन सुरेश जगताप याच्या सोबत २ तरुण विवाहितेच्या घराबाहेर येवून दरवाजा वाजवून पतीचा नातेवाईक सांगत दार उघडायला लावला.यानंतर घरात घुसत विवाहीतेला लज्जा उत्पन्न होईल असे अश्लील कृत्य केले. पीडित विवाहितेने आरडा ओरड केली असता, विवाहितेला व तिच्या पतीला ठार मारण्याची धमकी देत विवाहितेने पतीला बोलविले असता पतीला या संशयित तीन तरुणांनी मारहाण केली. या प्रकरणी संशयित आरोपी चेतन सुरेश जगताप, दादा चौधरी, बबलू पाटील, रा.पारोळा यांच्याविरोधात पारोळा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास स.फौ.बापूराव पाटील हे करीत आहेत.
















