मोहाडी : ‘तू वारंवार सापाच्या गोष्टी का सांगतोस’ वॉर्ड, या कारणावरून उद्भवलेल्या वादातून एका २७ वर्षीय तरुणाला लाकडी दांड्याने मारहाण करण्यात आली. ही घटना मोहाडी येथे बुधवारी (६ सप्टेंबर) रात्री १० वाजेदरम्यान घडली. यात रितेश निमजे (रा. सुभाष वार्ड, मोहाडी) हा युवक जखमी झाला. तक्रारीवरून पोलिसांनी सागर गंगाधर श्रीपाद व आदेश गंगाधर श्रीपाद या दोन्ही भावांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
बुधवारी सुभाष वॉर्ड येथे तिघे जण चर्चा करीत असताना सागर सापांबद्दल गोष्टी सांगत होता. यावेळी रितेशने त्याला मध्येच टोकले. तसेच ‘तू वारंवार सापाच्या गोष्टी का सांगतोस’, असे म्हणाला. यावरून उद्भवलेल्या वादात सागरने रितेशला थापड बुक्क्यांनी मारहाण केली. यावेळी रितेश घरी निघून गेला. नंतर लाकडी दांडा घेऊन आदेशने रितेशकडे जाऊन त्याला मारहाण केली. तसेच पाहून घेण्याची धमकी दिली. तक्रारीवरून पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला. तपास पोलीस उपनिरीक्षक दूधकावरा करीत आहेत. याबाबतचे वृत्त एका दैनिकाने दिले आहे.
















