बेळगाव (वृत्तसंस्था) महामेळाव्याच्या ठिकाणी घुसून कन्नड म्युझिक संघटनेच्या दोघांनी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी यांना काळे फासले. यामुळे मराठी भाषकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे याचा निषेध म्हणून उद्या मंगळवारी बेळगाव बंदची हाक देण्यात आली आहे.
कर्नाटक विधानसभेचे आज बेळगावमध्ये अधिवेशन सुरू होत आहे. मात्र, या अधिवेशनाला मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समिताच विरोध आहे. या अधिवेशनाचा निषेध करण्यासाठी बेळगावमध्ये समितीकडून महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, सकाळपासून हा महामेळावा हाणून पाडण्याचे प्रयत्न सुरू होते. पोलिसांकडूनही तसा दबाव आणला जात होता. त्यामुळे घटनास्थळीही तणाव होता. अशावेळी अचानक कन्नड म्युझिक संघटनेच्या दोघांनी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी यांच्यावर शाई फेकली. त्यामुळे पुन्हा एकदा बेळगाप्रश्न पेटला आहे.
मराठी जनतेला कायद्याचे धडे देणाऱ्या कर्नाटकी पोलिसांनी करवेच्या गुंडांना मात्र अभय देत नेहमीसारखीच बघ्याची भूमिका घेतली. सीमाभागात संतापाची लाट उसळली असून उद्या बेळगाव बंदची हाक दिली आहे.