भडगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील आमडदे येथे भरधाव वाळूचे ट्रॅक्टर घरांमध्ये घुसल्याने ११ वर्षीय बालिका ठार झाली. तर बालिकेच्या बहिणीसह शेजारील महिला जखमी झाल्याची घटना आज (बुधवार) पहाटे घडली.
या संदर्भात अधिक असे की, आमडदेनजीक वलवाडी रस्त्यावर गरीब वस्तीतील लोक सकाळी झोपेत होते. ५.३० वाजेच्या सुमारास वाळूचे ट्रॅक्टर तीन ते चार घरांमध्ये घुसले. त्यात वैशाली बालू सोनवणे (११) ही बालिका जागीच ठार झाली. तिची बहीण पिंकी सोनवणे (५) आणि घराशेजारी राहणारी बानूबाई वाघ (४४) या जखमी झाल्या. जखमींंना जळगाव जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, घटनेनंतर ट्रॅक्टरचालक पसार झाला आअसून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.