जळगाव (प्रतिनिधी) अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या जळगाव ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी भडगाव येथील माजी सभापती प्रदीप गुलाबराव पवार यांची निवड करण्यात आली आहे. याबाबतची घोषणा काँग्रेसचे जनरल सेक्रेटरी के.सी. वेणुगोपाल यांनी केली आहे.
काँग्रेसचे जनरल सेक्रेटरी के.सी. वेणुगोपाल यांनी ९ जिल्ह्यातील जिल्हाध्यक्षांची निवड शुक्रवारी जाहीर केल्या आहेत. काँग्रेसचे मावळते जिल्हाध्यक्ष अॅड. संदीप पाटील यांचा २०१४ ते २०२१ असा सात वर्षांचा कार्यकाळ राहिला. पवार यांनी विद्यापीठ प्रतिनिधीपासून राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. काँग्रेसचे माजी प्रदेश सरचिटणीस प्रदेश निरीक्षक अशी विविध पदे त्यांनी पक्षात भूषविली आहेत. यासह ते १९९८ साली भडगाव पंचायत समितीचे तर १९९७ साली जि.प. बांधकाम सभापती होते.
काँग्रेसला गतवैभव प्राप्त करून देण्याचे पूर्ण प्रयत्न – प्रदीप पवार
श्रेष्ठींचा विश्वास पक्षश्रेष्ठींनी जो विश्वास टाकला आहे त्यावर खरे उतरण्याचा पूर्ण प्रयत्न करणार आहे. काँग्रेसला गतवैभव प्राप्त करून देण्याचे पूर्ण प्रयत्न करेल. अशी प्रतिक्रिया नूतन जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार यांनी दिली.