जळगाव (प्रतिनिधी) मंत्री पदाचा रुबाब न दाखवता जबाबदारीचे भान ठेऊन तळागाळातील जनतेशी असलेली नाळ कधीही तुटू दिली नाही. जनता हाच माझा समाज मानून मतदार संघातील गाव लहान आहे की मोठे यापेक्षा गावाची गरज पाहून निधी दिला आहे. माझ्याकडे आशेने येणाऱ्या प्रत्येकाचे पक्ष विरहित काम करण्याचा सतत प्रयत्न करत असतो. विरोधकांकडे बोलण्यासारखे काही राहिले नसल्याने त्यांच्या टिकेला कामाने उत्तर देत आहे. ग्रामपंचायतीने जागा उपलब्ध केल्यास प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारत बांधकामासाठी ४ कोटींचा निधी मंजूर करणार असल्याची घोषणा पालकमंत्री तथा शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटील यांनी केली. ते भादली बु. येथे विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण प्रसंगी बोलत होते. कार्यक्रमच्या अध्यक्षस्थानी जिल्हा प्रमुख निलेश पाटील हे होते.
शेकडो तरुणांचा शिवसेनेत प्रवेश !
दिवसेंदिवस शिवसेनेकडे तरुणांचा कल वाढत असून शिवसेनचे नेते तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत भादली बु. येथे सर्व जातीधर्माच्या शेकडो तरुणांनि शिवसेनेत प्रवेश केला. त्यांचा मंत्री गुलाबराव पाटील व जिल्हा प्रमुख निलेश पाटील यांनी प्रवेश केलेल्या तरुणांचा सत्कार केला. यावेळी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख निलेश पाटील यांनी सिझनेबल पुढाऱ्यांचा जोरदार समाचार घेतला. विकासाचे व्हिजन असलेल्या ना. गुलाबराव पाटील यांच्या मंत्रीपदाचा गाव विकासासाठी उपयोग करून घेण्याचे आवाहन केले. जि.प.चे माजी उपाध्यक्ष लालचंद पाटील व सरपंच मिलिंद चौधरी यांनी भादली गावाला गुलाब भाऊंनी कोट्यावधींच्या दिलेल्या विकास कामांची उतराई भादलीकर करतील असा विश्वास व्यक्त करून पालकमंत्र्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार असल्याचे सांगितले.
या कामांचे झाले लोकार्पण व भूमिपूजन !
तालुक्यातील भादली बु. येथे राष्ट्रीय पेयजल योजनेअंतर्गत पाणीपुरवठा योजना २ कोटी १६ लक्ष, भादली ते तरसोद रस्ता डांबरीकरण – ३ कोटी ६० लक्ष , दोन खांबे ते दूध डेरी पर्यंतचा रस्ता काँक्रिटीकरण – २ कोटी ४० लक्ष, भादली ते कडगाव रस्ता डांबरीकरण- ४० लक्ष, भादली ते नशिराबाद रस्ता डांबरीकरण -५ कोटी , भंडारमाई रस्ता डांबरीकरण – ७० लक्ष, भादली ते जळगाव खुर्द रस्ता डांबरीकरण -५० लक्ष, जि. प. उर्दू शाळा खोली दुरुस्ती – १० लक्ष, अल्पसंख्यांक विकास निधीतून मुस्लिम शादीखाना बांधकाम – ३० लक्ष, आमदार निधीतून महर्षी वाल्मीक सभागृह बांधकाम – २० लक्ष, डीपीडीसीच्या नावीन्यपूर्ण योजनेअंतर्गत दत्त मंदिरालगत नाल्यावर संरक्षण भिंत बांधकाम – १० लक्ष, गावांतर्गत काँक्रिटीकरण व हनुमान नगर रस्ता काँक्रिटीकरण – २८ लक्ष , गावात बौद्ध विहार बांधकाम- २५ लक्ष, जल जीवन मिशन योजनेअंतर्गत पाणीपुरवठा योजना – २ कोटी, स्मशानभूमी सुशोभीकरण – १० लक्ष, ग्रामपंचायत इमारत बांधकाम – २५ लक्ष अशा गावाच्या सर्वांगीण विकासासाठी विधिवत पूजा करून तब्बल २० कोटी रुपये निधीच्या कामांचे लोकार्पण व भूमिपूजन शिवसेना नेते तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी दहावीच्या परीक्षेत कु. तृप्ती कोळी, कु.चैताली पाटील, कु.धनश्री अत्तरदे व मोहक पाटील या गुणवंत विध्यार्थ्यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते शिल्ड, प्रमाणपत्र, शाल व बुके देऊन सत्कार करण्यात आला.
यांची होती उपस्थिती !
याप्रसंगी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख निलेश पाटील, जि.प.चे माजी उपाध्यक्ष लालचंद पाटील, उपजिल्हा प्रमुख नरेंद्र सोनवणे, युवासेनेचे शिवराज पाटील, अजय महाजन, सामाजिक कार्यकर्ते तुषार महाजन, किशोर चौधरी, जितू नारखेडे, सरपंच मिलिंद चौधरी, उपसरपंच विद्याताई कावडे, परिसरातील सरपंच वासुदेव सोनवणे, हरिभाऊ कोळी, नितीन कोळी, मुकेश सोनवणे, संघटक योगेश कोळी, कडू कोळी, ग्रा.प.सदस्य मीराबाई कोळी, किर्तीताई कोळी, पद्मश्री पाटील, परेश रडे, मनोज चौधरी, सलीम पटेल, अलिंम पटेल, विभाग प्रमुख संदीप कोळी, हितेश नारखेडे, गण प्रमुख किशोर कोळी, भूषण पाटील, प्रवीण खडसे, मनोज चौधरी, शोभाताई झांबरे, विजयाताई, विकास धनगर, चेतन बर्हाटे यांच्यासह परिसरातील लोकप्रतिनिधी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात गण प्रमुख किशोर कोळी यांनी गावात सुरू असलेल्या २० कोटींच्या विविध विकास कामांची माहिती विषद केली. सूत्रसंचालन शाखा प्रमुख हितेश नारखेडे यांनी केले तर आभार विभाग प्रमुख संदीप कोळी यांनी मानले. गावांत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे आगमन होताच फटाक्यांची व घोषणांची आतिष बाजीत, ढोल ताश्यांच्या गजरात गावातून मिरवणूक काढण्यात आली. या प्रसंगी महिलांनी पालकमंत्र्याचे औक्षण केले. शाल श्रीफळ व बुके देऊन ग्रामपंचायत, वि.का. सोसायटी व ग्रामस्थांनी मंत्री गुलाबराव पाटील यांचा भव्य असा सत्कार केला.
















