धरणगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील बोरगाव येथील पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे कट्टर समर्थक भैय्या मराठे सर यांची नुकतीच शिंदे गटाच्या युवासेना जिल्हा उपसंघटकपदी निवड करण्यात आली आहे.
बोरगाव येथील भैय्या मराठे सर हे सुरुवातीपासून ना. गुलाबराव पाटील यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात. त्यामुळे त्यांची बाळासाहेबांचे शिवसेनेच्या युवासेना जिल्हा उपसंघटकपदी निवड करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीबद्दल पालकमंत्री नामदार गुलाबराव पाटील, जि प सदस्य प्रतापराव गुलाबराव पाटील यांनी अभिनंदन केले आहे.