मुंबई (वृत्तसंस्था) राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना आठ तासांच्या चौकशीनंतर अंमलबजावणी संचालनालयाने (ईडीने) अटक केली आहे. जुन्या मालमत्ता व्यवहार प्रकरणी नवाब मलिक यांची अंमलबजावणी संचालनालय (ईडी)कडून चौकशी केल्यानंतर ईडीने ही कारवाई केलीय. नवाब मलिक यांची राजकीय कारकीर्द कशी आहेत ही पाहूया.
मलिकांच्या २५ मोठ्या गोष्टी
नवाब मलिकांचं मूळ उत्तर प्रदेशात, पण त्यांच्या जन्माआधीपासून नवाब मलिकांचे वडील मुंबईत स्थायिक, पण काही कारणास्तव पुन्हा उत्तर प्रदेशात गेले
20 जून 1959 रोजी नवाब मलिक यांचा जन्म झाला उत्तर प्रदेशातील बलरामपूर जिल्ह्यातल्या उतरौला तालुक्यातील दुसवा गावातला
मलिक कुटुंबीयांचा पहिल्यापासूनच भंगारचा व्यवसाय
मुंबईतील डोंगरी परिसरात मलिक कुटुंब वास्तव्यास
21व्या वर्षी मलिकांचा मेहजबीन यांच्याशी विवाह
नवाब मलिक यांना फराज, आमीर दोन मुलं, तर निलोफर आणि सना या दोन्ही
विद्यार्थी आंदोलनापासून नवाब मलिक सक्रिय
मुंबई विद्यापिठाच्या फीवाढीविरोधातील आंदोलनापासून राजकारणात रुची
वयाच्या 25 व्या वर्षी 1984 साली पहिल्यांदा लोकसभा निवडणूक लढवली
गुरुदास कामत यांच्याविरोधात उभे राहिलेल्या मलिकांनी मिळाली 1984च्या लोकसभा निवडणुकीत अवघी 2620 मतं
1991 साली महापालिका निवडणुकीचं तिकीट काँग्रेसकडून नाकारण्यात आलं
1992च्या दंगलीनंतर मलिकांनी वृत्तपत्र सुरु केलं, या वृत्तपत्राचं नाव सांज समाचार
पुढे आर्थिक अडचणींमुळे सांज समाचार वृत्तपत्र बंद पडलं
काँग्रेसकडून तिकीट नाकारण्यात आल्यानं नवाब मलिकांचा समाजवादी पक्षात प्रवेश
1995च्या विधानसभा निवडणुकीत समाजवादी पक्षाकडून उमेदवारी
1995च्या विधानसभा निवडणुकीत मलिकांचा शिवसेनेचे उमेदवार सूर्यकांत महाडिकांकडून पराभव
1996 फेरनिवडणुकीत मात्र साडेसहा हजार मतांच्या फरकानं विजय आणि विधानसभेत इन्ट्री
1999साली पुन्हा एकदा विधानसभा निवडणुकीत विजय, गृहनिर्माण राज्यमंत्रिपदाचीही वर्णी
समाजवादी पक्षातील अंतर्गत मतभेदांना कंटाळून अखेर पक्षाला सोडचिट्ठी आणि 2001 साली राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मलिकांचा प्रवेश
राष्ट्रवादीकडून मलिकांना उच्च आणि तंत्रशिक्षण, कामगार मंत्रालय मंत्रिपद
माहीममधील जरीवाला चाळ पुनर्विकास प्रकल्पात गैरव्यवहार झाल्याचा मलिकांवर आरोप, त्यानंतर मलिकांवर राजीनामा देण्याची वेळ
2008 साली नवाब मलिक पुन्हा एकदा मंत्रिपदावर
नवाब मलिक यांची मोठी मुलगी निलोफर यांचे पती समीर खान यांना एनसीबीकडून अटक
कॉर्जेलिया क्रूझ ड्रग्स प्रकरण, एनसीबी आणि समीर वानखेडे यांच्यावर मलिकांची आक्रमक भूमिका
1993च्या बॉम्बस्फोटातील आरोपीकडून जमीन खरेदी केली असल्यानं मलिकांना ईडीकडून 7 तासांच्या चौकशीनंतर अटक
जोरदार टीका करत विरोधकांना घायाळ करणाऱ्या नवाब मलिक यांचं मूळ कुटुंबीय उत्तर प्रदेशातील आहे. नवाब मलिक यांचा जन्म उत्तर प्रदेशातील बलरामपूर जिल्ह्यातील रुसवा या गावात 20 जून, 1959 रोजी झाला. मलिक यांचे कुटुंब 1970 मध्ये उत्तर प्रदेशातून मुंबईला स्थलांतरित झाले. आणि पुढे मुंबईतच स्थिरावले. गेल्या 50 ते 60 वर्षांपासून वडीलांचा भंगाराचा व्यवसाय करतात. गेल्या वीस वर्षापासून व्यवसाय बघायचे. नवाब मलिक राजकारणात येण्यापूर्वी त्यांनी हा व्यवसाय बघितला. पंधरा ते वीस वर्षापर्यंत त्यांनी मुंबईत भंगाराचा व्यवसाय बघितला. मलिकांचे पहिले दुकान डोंगरी येथे होतं त्यानंतर कुर्ल्यात व्यवसायाला सुरुवात केली. आम्ही कुटुंबात सहा भाऊ आहोत. भंगार विकणे हा नवाब मलिक यांचा वडिलोपार्जित व्यवसाय होता. मुंबईत दाखल झाल्यानंतर सुरुवातीपासूनच मलिक कुटुंब डोंगरी परिसरात वास्तव्याला होतं.
नवाब मलिक यांच्या शिक्षणाचीही रंजक गोष्ट आहे. प्राथमिक शाळेत असताना त्यांना इंग्रजी माध्यमामध्ये घालण्यात आलं होतं. पण नातेवाईकांच्या विरोधानंतर त्यांना उर्दु शाळेत घालण्यात आलं. सीएसटीएम परीसरातल्या अंजुमन इस्लाममधून त्यांची बारावी पूर्ण झाली. पण बीएच्या अखेरच्या वर्षी ते परीक्षा देऊ शकले नाहीत
मुंबई विद्यापीठाच्या फीवाढीविरोधात पुकारलेल्या आंदोलनात नवाब मलिक सहभागी झाले. पोलिसांच्या लाठीहल्ल्यात जखमी झाले आणि तिथेच विद्यार्थी आंदोलनाच्या माध्यमातून राजकारणाशी जोडले गेले. 1983 मध्ये संजय गांधी यांच्या अपघाती निधनानंतर त्यांच्या पत्नी मनेका गांधी यांनी संजय विचार मंच नावाने वेगळा गट स्थापन केला. याच गटातून नवाब मलिक यांनी लोकसभा लढवली पण ते पराभूत झाले.
वयाच्या एकविसाव्या वर्षी 1980 साली नवाब यांचा विवाह मेहजबीन यांच्याशी झाला. त्यांना फराज, आमीर ही दोन मुलं तर निलोफर आणि सना या दोन मुली आहेत. नवाब मलिक यांनी शिवसेनेच्या सामना या वृत्तपत्राच्या धर्तीवर सांज समाचार नावाचं वृत्तपत्र सुरु केलं होतं पण आर्थिक अडचणींमुळे ते बंद पडलं पण त्यानंतर नवाब मलिक यांनी समाजवादी पक्षात प्रवेश केला. बाबरीमुळे मुस्लिम मतदारांमध्ये समाजवादी पक्ष लोकप्रिय होऊ लागला होता आणि त्याचा फायदा नवाब मलिक यांना मिळाला.
नवाब मलिक यांच्या राजकीय कारकीर्दीत त्यांच्यावर राजीनामा देण्याचीही वेळ आली होतं. माहिमच्या चाळ पुनर्विकासामध्ये गैरव्यवहार झाल्याचा आरोप झाला आणि या प्रकरणामध्ये खुद्द अण्णा हजारे यांनी एन्ट्री घेतली. त्यावेळी त्यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. पण 2008 साली त्यांना पुन्हा मंत्रिपद बहाल करण्यात आलं.
जावई समीर खान यांना ड्रग्ज तस्करी प्रकरणी अटक झाली आणि तेव्हापासून नवाब मलिक यांनी एनसीबीच्या कारवायांविरोधात सवाल विचारण्यास सुरुवात केली. जेव्हा न्यायालयानं समीर खान यांना जामीन मंजूर केला. तेव्हापासून तर नवाब मलिक यांनी एनसीबीच्या कारवाया आणि समीर वानखेडे यांच्याविरोधात एकापाठोपाठ एक गंभीर आरोप करण्यास सुरुवात केली.
आर्यन खान ड्रग्ज प्रकरण समोर आल्यानंतर त्याचा सर्वाधिक आक्रमक विरोध नवाब मलिक यांच्याकडूनच झाला. जवळपास 20 ते 25 दिवस नवाब मलिक यांनी रोज सकाळी उठून पत्रकार परिषद घेतली आणि सत्ताधारी भाजपाची घेराबंदी केली. याच काळात त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या संबंधित व्यक्तींवरही आरोप केले.
गेल्या काही दिवसात ईडीने मनी लाँड्रिंग प्रकरणी मुंबईत छापेमारी केली होती. यामध्ये दाऊदचे नातेवाईक आणि जवळच्या व्यक्तींचा समावेश होता. दाऊद आणि त्याच्याशी संबंधित मालमत्ता खरेदी करणारे, व्यवहार करणारे राजकारणी आणि इतर महत्त्वाच्या व्यक्ती ईडीच्या रडारवर आले होते. याच प्रकरणात आता नवाब मलिक यांची चौकशी सुरू आहे अशी माहिती मिळते.
पत्रकार ते राजकारणी हा नवाब मलिक यांचा आत्तापर्यंतचा प्रवास थक्क करणारा आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा मुंबईतला एक प्रमुख मुस्लिम चेहरा म्हणून नवाब मलिक यांच्याकडे बघितलं जातं. पण आता नवाब मलिक केंद्रीय तपास यंत्रणांच्या रडारवर आहेत. त्यामुळे या पुढील नवाब मलिक यांचा प्रवास नेमका कसा राहतो हे पाहणं रंजक ठरणार आहे.