चोपडा (प्रतिनिधी) महाराष्ट्रातील सर्वच पक्ष शेतकरीच्या नावाने निवडून येत असतात. परंतु शेतकरी हिताचा एकही निर्णय नसतो. यांचे उदाहरण म्हणजे महाराष्ट्रात रोज होणाऱ्या शेतकरी आत्महत्या होय. तर दुसरीकडे त्याच्या विपरीत तेलंगणा राज्य होय. तेलंगणा राज्यात एकही शेतकरी आत्महत्या नाही. तेलंगणा राज्यसरकार शेतकऱ्यांना शंभर टक्के विज पुरवठा करत आहे. पीक खर्चासाठी वार्षिक दहा हजार रुपये प्रति एकर दराने रोख रक्कम देत असते, यामुळे शेतकऱ्याच्या समस्या सोडविण्यासाठी भारत राष्ट्र समिती पार्टी महाराष्ट्रात पाय रोवणार असल्याचे प्रतिपादन एका पत्रकार परिषदेत तालुका समन्वयक समाधान बाविस्कर यांनी केले.
तेलंगणा राज्यात कोणत्याही शेतकऱ्याच्या मृत्यु झाल्यास त्याचा कुटुंबाला किसान विमा योजनेअंतर्गत तेलंगणा सरकारच्या वतीने पाच लाख रुपयांची रोख मदत दिली जाते. हा विमाचा 100 टक्के प्रीमियम हे सरकार भरत असते. तसेच तेलंगणा सरकार ने 7000 खरेदीची केंद्रे स्थापन केली असून या खरेदी केंद्रावर पिकविलेले अन्नधान्य आधारभूत किमतीत खरेदी केला जातो. तेलंगणा राज्यात भारत राष्ट्र समिती पार्टीने शेतकरी सुखी व्हावेत म्हणून 5 लाख करोड रुपये निधी खर्च केला आहे, अश्या विविध योजना शेतकरी, दलित,आदिवासी, ओबीसी, शोषित, वंचित, पीडित, अल्पसंख्याक, विध्यार्थी, युवक, बेरोजगार,महिला अश्या अनेकांसाठी भरघोस योजना राबविण्यात येत आहे.
भारत राष्ट्र समिती पार्टीचा अजेंडा घेऊन जय किसान,जय महाराष्ट्र हा नारा घेऊन आम्ही जळगाव जिल्हा पिजून काढणार आहोत. आगामी काळातील पंचायत समिती, जिल्हा परिषद नगरपालिका,तसेच विधानसभा, लोकसभा च्या सर्व निवडणूक स्वबळावर लढणार आहोत, असेही तालुका समन्वयक समाधान बाविस्कर यांनी विश्रामगृहात झालेल्या पत्रकार परिषेदेत बोलताना सांगितले.
मी भारतीय जनता पार्टीचा सक्रिय कार्यरता होतो. पक्षाच्या माध्यमातून अनेक काम केली. परंतु पक्षात नुकतेच आलेल्याना मानसन्मान आहे. त्यांना कोणत्याही निवडणुकीत उभे केले जाते. परंतू आमच्या सारखा कार्यकर्त्यांना कोणतेही निवडणूक लढू दिली जात नाही. आणि शेतकरी हिताचा निर्णय नाही. त्यामुळे मी नुकताच पक्षाला राम राम करत भारत राष्ट्र समिती पार्टीत सक्रीय कार्यकर्ता झालो आहे. ह्या पक्षासाठी अहोरात्र झटत राहीन. भारत राष्ट्र समिती पार्टी घराघरा पर्यंत जायला हवा यासाठी उदया पासून तालुक्याभरात किसान रथ घेऊन जाणार आहोत. या पक्षात शेतकरी, दलित,आदिवासी, ओबीसी, शोषित, वंचित, पीडित, अल्पसंख्याक, विध्यार्थी, युवक, बेरोजगार, महिलावर्ग यांनाच घेतले जाणार आहे. तसेच चोपडा तालुक्यातून आगामी काळात 100 ते 150 लोकांना तेलंगणा राज्य बघण्यासाठी व तेथील मुख्यमंत्री साहेबांना भेटण्यासाठी घेऊन जाणार असल्याचे विधानसभा तालुका प्रमुख दिपक पाटील यांनी सांगितले.
यावेळी महिला प्रमुख कोमल बापूराव पाटील, कमिटी प्रमुख पमाबाई व्यंकट पानपाटील, सामाजिक कार्यकर्त्या वर्षा शाम चौधरी, ग्रामपंचायत सदस्य सुशीला रामदास सोनवणे, सामाजिक कार्यकर्त्या अक्काबाई नथ्थु सौंदणे, तुळसाबाई बाबूलाल सोनवणे, सरालाबाई संतोष पाटील, सतीश बाविस्कर आदी मंडळी हजर होती.