धरणगाव (प्रतिनिधी) भारतीय जनता पार्टीची धरणगाव शहर कार्यकारीणी जाहीर झाली आहे. त्यांनुसार शहरध्यक्षपदी दिलीप माळी यांची तर सरचिटणीस म्हणून कैलास माळी,कन्हैया रायपूरकर यांची निवड करण्यात आली आहे.
शहर भाजप कार्यकारणी शहराध्यक्ष दिलीप महाजन यांनी जेष्ठ नेते सुभाष अण्णा पाटील, जिल्हाउपाध्यक्ष पी.सी.आबा पाटील, शिरीषआप्पा बयस,चंद्रशेखरदादा अत्तरदे,अँड.संजय महाजन,तालुकाध्यक्ष जिजाबराव पाटील,शेखरदादा पाटील,प्रकाशदादा सोनवणे,पुनिलाल महाजन यांच्या मार्गदर्शनानुसार खालील प्रमाणे कार्यकारीणी जाहिर केली. शहराध्यक्ष दिलीप श्रावण माळी तर सरचिटणीसपदी कैलास माळी (सर), कन्हैया भास्कर रायपूरकर, शहर उपाध्यक्ष म्हणून सुनिल एकनाथ चौधरी,नितीन गजाननसिंह बयस (कडूआप्पा),योगेश श्रावण ठाकरे, संजय एकनाथ पाटील, शरद दौलत भोई, राजेंद्र लोटन महाजन, चिटणीस म्हणून विजय नामदेव महाजन,जुलाल जंगलु भोई,अनिल जगन्नाथ महाजन,आनंद नरेंद्र वाजपेयी,सुधाकर विठ्ठल साळुंखे,मधुकर युवराज पाटील,आनंदा भावलाल धनगर,सुदाम किसन मराठे,महेंद्र मणिलाल महाजन,किशोर पुना चौधरी,ज्ञानेश्वर मांगो महाजन, तर कोषाध्यक्ष म्हणून हितेश विठ्ठलभाई पटेल, कार्यालय मंत्री विकास देवालाल चव्हाण तर कार्यकारिणी सदस्य म्हणून सुनिल विठ्ठल वाणी,अशोक रामनाथ भांडारकर,एकनाथ पाटील (आबा दाढी),प्रल्हाद बाबुराव पाटील,मनोहर बडगुजर,दत्तात्रय भट, अँड.संदिप जगन्नाथ पाटील,सुरेश गोविंदा महाजन,दगडू रामा मराठे,अमोल कासार,संतोष देविदास सोनवणे,शाम गोवर्धनदास भाटीया,विशाल विनायक अमृतकर अशा सर्व पदाधिकारींची निवड करण्यात आली. सर्व नवनियुक्त पदाधिकारींना शुभेच्छा देऊन अभिनंदन करण्यात आले. तालुका प्रसिद्धी प्रमुख किशोर माळी यांनी याबाबतची माहिती कळवली आहे.