धरणगाव (प्रतिनिधी) नाभिक महामंडळ महिला राष्ट्रीय अध्यक्षा भारती सोनवणे यांनी धरणगाव येथे महेश निकम यांच्या घरी सदिच्छा भेट दिली असता त्यांचा सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी धरणगाव येथील महिला पदाधिकारी प्रीती महेश निकम, जळगाव जिल्हा नाभिक महामंडळ उप संघटक, तथा समाज अध्यक्ष सतीश बोरसे, सोनवणे, जेष्ठ समाज सेवक मधुकर निकम, युवा सेनेचे शहर अध्यक्ष कमलेश बोरसे, प्रवीण निकम, चंद्रकांत फुलपगार, दिगम्बर निकम यांनी भारती सोनवणे यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. याप्रसंगी भारती सोनवणे यांनी धरणगाव शहरात समाज विषयी सर्व माहिती जाणून घेतली.
नाभिक समाज बांधवानी नुसते व्यवसाय न करता त्या सोबत काही जोड व्यवसाय सुद्धा करावा जेणे करून कोरोना सारखा महाभयंकर आजाराची तिसरी लाट आली तर परिवारचा उदरनिर्वाह करण्यासाठी सलून व्यवसाय सोबत असलेल्या जोड व्यवसायचा फायदा होऊ शकतो. सर्व समाज बांधवानी उद्योग आधार नोंदणी करणे सुद्धा आवश्यक असून भविष्यात व्यवसायाची शासन दरबारी नोंद असली की कुठलाही फायदा होऊ शकतो. सर्व समाज बांधवानी आपल्या पाल्यांना शिक्षण देऊन उद्याचा आदर्श नागरिक घडवावे. व त्यांच्या हातून समाजाची, राज्य, व राष्ट्रची चांगली सेवा होईल, असे चांगले कार्य आपल्या पाल्यांना करायला लावणे सुद्धा जरुरीचे आहे. असे अति चांगले विचार महाराष्ट्र नाभिक महामंडळच्या महिला प्रदेश अध्यक्षा भारती सोनवणे यांनी व्यक्त केले.