धरणगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील सोनवद परिसरातील सर्वात मोठे श्री स्वामी समर्थ महाराज यांचे भव्य केंद्र उभारण्यात आले आहे. जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव गुलाबराव पाटील यांच्या हस्ते आज पेव्हर ब्लॉकचे भूमिपूजन करण्यात आले.
प्रतापराव पाटील हे स्वामी समर्थ यांचे मोठे भक्त असून, केंद्र उभारण्यात त्यांचे मोठे योगदान आहे. त्यांनी या केंद्रासाठी आतापर्यंत केंद्राला लागणारी सर्व खडी, केंद्रासाठी लागणारी पूर्ण मारबल स्टाईल व हायमस्ट लॅम्प दिला असून आता ५० ब्रास पेव्हरब्लॉकही स्वखर्चातून दिले आहेत. या भूमिपूजन सोहळ्याच्या वेळी सभापती प्रेमराज पाटील, शिवसेना शिंदे गटाचे तालुका प्रमुख गजानन नाना पाटील, भाजपचे निर्दोष पवार, भाऊसाहेब पाटील, शिवसेनेचे चंदूशेठ भाटिया यांच्यासह आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.