जळगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील तरसोद येथे राज्याचे पाणीपुरवठा व स्वछता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या निधीतून राजपूत समाजाच्या सामाजिक सभागृहाचे भूमिपूजन माजी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव गुलाबरावजी पाटील यांच्या हस्ते झाले.
तरसोद येथे राजपूत समाजाचे सभागृह व्हावे याकरिता समाजबांधवांनी अनेक दिवसांपासून मागणी केली होती. या सभागृहामुळे समाजबांधवांना कार्यक्रम घेणे सोईचे ठरणार आहे. गावात हक्काचे सभागृह होणार असल्याने नागरिकांनी आनंद व्यक्त केला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवसेना जिल्हाप्रमुख निलेश पाटील होते तर प्रमुख मान्यवर म्हणून तालुकाप्रमुख शिवराज पाटील, उपतालुका प्रमुख जितेंद्र राणे, पंकज पाटील, शांताराम राजपूत, सुदाम राजपूत, प्रविण राजपूत, हिरालाल राजपूत व राजपूत समाजाची सर्व मंडळी व मान्यवर उपस्थित होते.