मुंबई (वृत्तसंस्था) भोसरी भूखंड कथित घोटाळा प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे (Eknath Khadse) यांच्या पत्नी मंदाकिनी एकनाथराव खडसे (Mandakini Khadses) यांना मुंबई उच्च न्यायालयाकडून अंतरिम दिलासा कायम ठेवण्यात आला आहे.
पुणे भूखंड कथित घोटाळा प्रकरणी एकनाथराव खडसे यांच्यावर गंभीर आरोप झाले होते. या प्रकरणी चौकशी सुरू आहे. तसंच कोर्टात सुनावणी सुद्ध सुरू आहे. पुणे एमआयडीसी जमीन गैरव्यवहार प्रकरणात मंदाकिनी खडसे यांच्या अटक पूर्व जामिनावर आज सुनावणी पार पडली. मुंबई उच्च न्यायालयात न्यायाधीश अनुजा प्रभुदेसाई यांच्या कोर्टात ही सुनावणी झाली. या प्रकरणात एकनाथराव खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे यांना अंतरिम दिलासा मिळाला आहे. मंदाकिनी खडसे यांना मुंबई उच्च न्यायालयाकडून आधीच दिलासा मिळाला होता.