जळगाव (प्रतिनिधी) बीएचआर घोटाळ्यात आज पुणे आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केलेल्या बारा आरोपींपैकी तिघांना न्यायालयात हजर केले होते. या तिघांवर आर्थिक गुन्हे शाखेने अत्यंत गंभीर आरोप ठेवले आहेत. जाणून घ्या नेमके काय आहेत आरोप ?
१) प्रेम रामनारायण कोगटा रा. ६९ एमआयडीसी एरिया जळगाव याचा गुन्हयातील सहभाग –
सदर आरोपी याने बीएचआर पतसंस्था नवी पेठ जळगाव येथे त्याचे नावे असलेले कर्ज खाते क्रमांक ०००३२०७००२४७ मधील एकूण रक्कम रुपये २,१५,१२,६८९/- ही सर्व रक्कम वेगवेगळ्या ठेवीदारांचे कमी किमतीत घेवून पूर्ण पैसे परतफेड करण्यासाठी वापर केला आहे. असे करताना त्याने स्वतः नेमलेल्या एजंट मार्फत ठेवीदारांमध्ये सदर पतसंस्था बुडाली असून मुदत ठेवीच्या ३० टक्के रक्कम मिळेल परंतु त्यासाठी मुळ पावत्या जमा करून तयार करून आणलेल्या प्रतिज्ञा पत्रावर सह्या कराव्या लागतील. अन्यथा कोणाला ठेवीचे पैसे मिळणार नाहीत, ठेवीदाराच्या ठेवी बुडाल्यात जमा आहेत. पतसंस्थेकडून पैसे मिळणे अशक्य आहे अशी मिती निर्माण करून त्यांना फक्त ३० टक्के रक्कम देवून ठेवपावत्या खरेदी करून ठेवीदारांचे आर्थिक नुकसान केले आहे.
२) जयश्री अंतिम तोतला रा. ६०१, ६ वा मजला आर्चीड ५ वा रोड खार जिमखाना जवळ खार वेस्ट मुंबई हिचा गुन्ह्यातील सहभाग –
सदर आरोपी ही बीएचआर संस्थेत नवीपेठ येथे कर्ज खाते क्रमांक – ०००३२०७०००५६ मधील एकूण बाकी रक्कम १,६५,४९,३४८ यापैकी १,३९,४९,३४८ रुपये ही रक्कम वेगळ्या ठेवदारांच्या ठेवी कमी किमतीत घेऊन पुर्ण पैसे परतफेड करण्यासाठी वापर केला आहे. असे करतांना तिने स्वतःनेमलेल्या एजंट मार्फत ठेवीदारांमध्ये सदर पतसंस्था बुडाली असुन जी रक्कम मिळत आहे ती गुपचुप पदरात पाडून घ्या नाही तर ती पण मिळणार नाही कुणालाच ठेवी चे पैसे मिळणार नाही ठेवीदारांच्या ठवी बुडल्यात जमा आहे, पतसंस्थेकडून पैसे मिळणे अश्यक्य आहे. अशी भीती निर्माण करून त्यांना फक्त 30 टक्के रक्कम देऊन ठेवपावत्या खरेदी करून ठेवीदारांचे आर्थिक नुकसान केले आहे.
३) अंबादास आबाजी मानकापे रा. प्लॉट नं. ३१ शिवज्योती कॉलनी एन-६ सिडको औरंगाबाद व प्लॉट नं. ३१८२ आदर्श बँकेचे वर शिवाजी सोसायटी सिडको औरंगाबाद यांचा गुन्ह्यातील सहभाग-
सदर आरोपी याने बीएचआर पतसंस्था औरंगाबाद शाखा येथे त्यांचे नावे असलेले कर्ज खाते क्र. ००३२०७००२९० मधील एकूण बाकी कर्ज रक्कम रुपये ३,३१,१६,६३८/- यापैकी रुपये २,७१,१६,६३८ /- हि रक्कम वेगवेगळ्या ठेवीदारांच्या ठेवी कमीत किमतीत घेऊन पूर्ण पैसे परतफेड करण्यासाठी वापर केला आहे. असे करताना त्याने स्वतः ठेवीदारांना सक्षम भेटून पैसे हवे असतील तर पावत्या माझ्याकडे जमा करा, मी माझ्या सोयीने ३० टक्के रक्कम तुम्हाला देईल, त्याप्रमाणे तुम्हाला पैसे मिळाल्याबद्दल स्टँम्पपेपर वर लिहून द्यावे लागेल असे सांगून पतसंस्थेकडून पैसे मिळणे अशक्य आहे अशी भीती निर्माण करून त्यांना फक्त ३० टक्के रक्कम देऊन ठेवपावत्या खरेदी करून ठेवीदारांचे आर्थिक नुकसान केले आहे.
वरील नमूद आरोपींनी सदर पतसंस्थेकडे कर्जाच्या नावाने घेतलेल्या ठेवीदारांचा पैसा पूर्ण परतफेड न करता पतसंस्थेचे अवसायक पहिले आरोपी नामे जितेंद्र गुलाबराव कंडारे, अटक आरोपी सुजित सुभाष वाणी व इतर यांच्याशी संगनमत करून पूर्ण रक्कम परतफेड केल्याच्या खोट्या नोंदी करून ठेवीदारांचा केवळ ३० टक्के रक्कम बेकायदेशीर रित्या अदा करून महाराष्ट्र मल्टीस्टेट को. ऑप अँक्ट २००२ चे नियम २९चे जाणीवपूर्वक व हेतुपुरस्पर उल्लंघन केले आहे. व इतर ठेवीदारांना सुद्धा त्यांच्या कष्टाची व हक्काची रक्कम समप्रमाणात मिळणे आवश्यक्य असतांना या गैरकृत्यामुळे त्यांना वंचित ठेवले.