जळगाव (प्रतिनिधी) बीएचआर घोटाळ्यातील मुख्य संशयित तथा अवसायक जितेंद्र कंडारेची पोलीस कोठडी संपल्यानंतर त्याला आज न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने कंडारे ची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे.
बीएचआर घोटाळ्यातील मुख्य सूत्रधार तथा अवसायक जितेंद्र कंडारेला पुणे आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने इंदोरमधून नुकतीच अटक केली होती. दरम्यान, कंडारेला आज पुणे न्यायालयात हजर केले असता त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. मागील सात महिन्यापूर्वी आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने बीएचआर घोटाळ्यात जळगाव शहरामध्ये धाडसत्र राबविले होते. यावेळी अनेक संशयितांना अटक झाली होती. परंतु मुख्य संशयित असलेला सुनील झंवर आणि अवसायक जितेंद्र खंडारे हा फरार होता. त्यामुळे आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने राज्यासह परराज्यात देखील यांच्या शोधार्थ अनेक पथके पाठवली होती. परंतु दोघेजण पोलिसांना मागील सात महिन्यापासून गुंगारा देण्यात यशस्वी होत होते. परंतु आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने मोठ्या शिताफीने सापळा रचून इंदूरमधून अटक केली होती. कंडारेला न्यायालयात कोर्टात हजर केले असता सरकार पक्षातर्फे अँड.प्रवीण चव्हाण यांनी जितेंद्र कंडारेला पोलीस कोठडी मिळण्यासाठी जोरदार युक्तिवाद केला. तर पोलीस कोठडीत असताना जळगाव येथील मुख्य शाखेच्या कार्यालयातील तर घरातून अडीच हजार फायलिंग पैकी पुराव्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या 25 फाईली कंडारेने पोलिसांना काढून दिल्या आहेत. या फाईलीमधून तपासाच्या दृष्टीने पोलिसांना महत्त्वपूर्ण धागे मिळाले आहेत.
दरम्यान, कंडारेच्या अटकेमुळे बीएचआर घोटाळ्यातील अनेक बाबींचा लवकरच उलगडा होण्याची शक्यता आहे.
पुणे आर्थिक गुन्हे शाखेने बीएचआर घोटाळ्यातील मुख्य सूत्रधार अवसायक जितेंद्र कंडारेने इतर आरोपींसोबत मिळून अवघ्या पाच मालमत्ता विक्री करून तब्बल ४८ कोटी ५६ लाख ८२० रुपयांचा अपहार केला आहे. तसेच सन २०२० मध्ये कंडारे व महावीर जैन या दोघांमध्ये तब्बल १४८ वेळेस संभाषण झालेय. तर कंडारेकडून जप्त हार्डडिस्कमध्ये बीएचआरची सन २०२० ची स्कॅन केलेली मिळून आली आहेत. एवढेच नव्हे तर, आतापर्यंत झालेल्या फॉरेन्सिक ऑडिटमध्ये अंदाजे ६५० कर्जखाती एफ.डी. मॅचिंगकरून निरंक केल्याचे निष्पन्न झाले आहे. परंतू यापैकी बऱ्याच कर्जदारांच्या कर्ज मागणी अर्ज व एफ.डी. मॅचिंग झालेल्या फाईल्स कार्यालय झडतीमध्ये मिळून आलेल्या नाहीत. या सर्व फाईल्स पुराव्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाच्या असून त्या कुठे लपवून ठेवल्या आहेत, यासह इतर महत्वपूर्ण मुद्द्यांवर कंडारेची आता कसून चौकशी सुरु आहे. थोडक्यात पोलिसांनी कंडारेच्या घोटाळ्याची संपूर्ण कुंडलीच शोधून न्यायालयासमोर ठेवली होती.
विजय वाघमारे (9284058683)
















