जळगाव (प्रतिनिधी) भाईचंद हिराचंद रायसोनी (बीएचआर) पतसंस्थेमधील गैरव्यवहाराशी संबंधित गुन्ह्यात जामनेरचे माजी नगराध्यक्ष पारस ललवाणी यांना अटक झाल्याची चर्चा अखेर अफवा असल्याचे स्पष्ट झाले आहे. आर्थिक गुन्हे शाखेच्या आयुक्त भाग्यश्री नवटके यांनी ललवाणी यांच्या अटकेच्या वृत्ताचे खंडन केले आहे.
जामनेरचे माजी नगराध्यक्ष पारस ललवाणी यांना सोमवार सायंकाळी पुण्यातुन चौकशी कामी ताब्यात घेतल्याची अफवा पसरली होती. यासंदर्भात आर्थिक गुन्हे शाखेच्या आयुक्त भाग्यश्री नवटके यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी अशा नावाच्या व्यक्तीला अटक केल्याचे नाकारले. दरम्यान, पतसंस्थेमधील गैरव्यवहारामध्ये जळगाव जिल्ह्यासह अनेक ठिकाणचे राजकारणी, उद्दोजक अडकले आहेत. आर्थिक गुन्हे शाखेने कसून चौकशीला सुरुवात केली असून लवकरच मोठी नावे समोर येण्याची शक्यता आहे.