जळगाव (प्रतिनिधी) बीएचआर घोटाळ्यातील मुख्य सूत्रधार जितेंद्र कंडारे हा गुन्हा दाखल झाल्यापासून सुमारे ७ महिन्यापासून बेपता होता. या कालावधीत तो दिल्ली, गुजरात व मध्यप्रदेशसह इतर राज्यांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वास्तव्यास असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. तसेच कंडारे जवळून ४ मोबाईल जप्त करण्यात आले होते. त्यामुळे मोबाईलवरून कंडारे कुणाकुणाच्या संपर्कात होता?. सुनील झंवर, कुणाल शहा यांच्यासोबत त्याचे काही बोलणे झालेय का?. तसेच मागील ७ महिन्यात त्याला लपून राहण्यास कुणी-कुणी मदत केली?, अशी सर्व लोकं चौकशीच्या फेऱ्यात अडकण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
गुन्हा दाखल झाल्यापासून कंडारे साधारण ७ महिन्यापासून फरार होता. याकाळात कंडारे दिल्ली, गुजरात व मध्यप्रदेशसह इतर राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी वास्तव्यास असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. दुसरीकडे कंडारेला अटक केल्यानंतर त्याच्याजवळून पतसंस्थेचा बॅकअप डेटा असलेल्या ३ हार्डडिस्क, ४ मोबाईल हॅन्डसेट आणि पतसंस्थेशी संबंधित काही महत्वपूर्ण कागदपत्रे मिळुन आली होती.
आता आर्थिक गुन्हे शाखा कंडारे मागील ७ महिन्यापासून त्याचे नेमके वास्तव्य कोठे होते?, तसेच तो या कालावधीत कोणाच्या संपर्कात होता. याचा पोलीस तपास करणार आहेत. कारण पोलिसांना हवे असलेल्या संशयित आरोपींपैकी कुणाल शहा, सुनील झंवर माहेश्वरी आणि योगेश साखलाच्या संपर्कात असल्याचा पोलिसांना संशय आहे. त्यामुळे कंडारेकडून मिळून आलेल्या चारही मोबाईलचे कॉल डीटेल्स काढून पोलीस पुढील तपास करणार आहेत.
तसेच फरारच्या कालावधीमध्ये कंडारेने पतसंस्थेतील अधिक दस्तऐवज, हार्डडिस्क वगैरे पुरावा अन्यत्र कोणाकडे लपवून ठेवला असण्याची किंवा नष्ट केल्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे याबाबत कंडारेची कसून चौकशी सुरु असून पुरावे गोळा करण्याचा पोलीस प्रयत्न करणार आहेत. अगदी कंडारे फरार असताना ज्या ठिकाणी वास्तव्यास होता. त्या ठिकाणी त्याला प्रत्यक्ष नेऊन पोलीस तपास करणार आहेत. दुसरीकडे कंडारेची बँक खाती व स्थावर जंगम मालमत्ता याबाबतही पोलिसांनी तपास सुरु केला आहे. कारण घोटाळ्याची रक्कम कंडारे नेमकी कुठे अडकवली आहे?. याची माहिती मिळवण्याचा प्रयत्न पोलीस करत आहेत. दरम्यान, कंडारेच्या संपर्कात जळगावातील काही लोकं असल्याचे कळते.